औषधी घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:52 IST2019-08-12T00:51:48+5:302019-08-12T00:52:22+5:30
अचानक आग लागल्याने औषधी घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक झाला.

औषधी घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अचानक आग लागल्याने औषधी घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक झाला. ही घटना रविवारी पहाटे औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगाव पाटी येथे घडली.
औरंगाबाद येथून औषधी घेऊन एक टेम्पो कर्नाटककडे जात होता. औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगाव पाटी (ता.अंबड) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेनंतर शहागड पोलिसांनी आग विझविण्यासाठी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना, अंबड, जालना नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण केले होते. पोलीस व कारखान्याचे सुरक्षा रक्षक एफ.एम.दुंगे, नारायण खोजे, राहुल चणाड, चालक रघू विठोरे व ग्रामस्थांनी आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली, हे स्पष्ट होऊ शकले नाही.