‘द बर्निंग टेम्पो’...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:51 AM2019-02-26T00:51:02+5:302019-02-26T00:52:02+5:30
बदनापूर येथे सोमवारी आगीच्या दोन घटना घडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : बदनापूर येथे सोमवारी आगीच्या दोन घटना घडल्या एका घटनेत महामार्गावर धावत्या मालवाहतुक करणा-या छोटया टेम्पो ला आग लागल्यामुळे हे वाहन जळून भस्मसात झाले तर दुसरीकडे शहरातील तालुका लघु पशुचिकित्सालयाला आग लागल्यामुळे या दवाखान्यातील औषधी, कागदपत्रे, फर्निचर जळाले आहे.
बदनापूर शहरात सोमवार आगीचा दिवस ठरला. दोन वेगवेगळ्या घटनेत प्रचंड आर्थिक नुकसान झाले, मात्र सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही़ येथील जालना-औरंगाबाद महामार्गावर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एम एच - २० बीडी - ५५४७ या छोटा टेम्पो औरंगाबादहून नांदेडकडे जात असताना या गाडीला अचानक आग लागली. या अचानक लागलेल्या आगीत टेम्पोमधील केमिकल, प्लायवूड असे विविध साहित्य आणि टेम्पो भस्मसात झाला, या आगीची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक बोलकर, राजपूत, पोउपनि. चैनसिंग गुसिंगे आणि ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी तसेच बदनापूर येथील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र, या गाडीतील साहित्याने काही वेळातच मोठा पेट घेतल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले त्यानंतर अग्निशामक दलाची गाडी आली परंतु तोपर्यंत या वाहनासह सर्वच जळून भस्मसात झाले. वाहकाने प्रसंगावधान राखून वाहनाबाहेर आल्यामुळे तो बचावला. यावेळी या महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली त्यामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होत्क़
जनावरांच्या दवाखान्याला आग
येथील झोपडपटटी परीसरात असलेल्या तालुका लघु चिकित्सालयात सोमवारी दुपारी अचानक आग लागली, या आगीत लाकडी फर्निचर जळाले.