१० कोटींची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:17 AM2018-05-03T01:17:40+5:302018-05-03T01:17:40+5:30

जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नोंदणी केलेल्या साडेआठ हजार शेतकऱ्यांपैकी ४ हजार ९ शेतक-यांची १० कोटी ४७ लाख ८१ हजार रूपये किंमतीची ३७ हजार ७६६ क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली आहे.

Buy 10 million pounds of tur | १० कोटींची तूर खरेदी

१० कोटींची तूर खरेदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नोंदणी केलेल्या साडेआठ हजार शेतकऱ्यांपैकी ४ हजार ९ शेतक-यांची १० कोटी ४७ लाख ८१ हजार रूपये किंमतीची ३७ हजार ७६६ क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली आहे.
४ हजार शेतक-यांची तूर खरेदी अद्यापही बाकी असल्याचे चित्र आहे. १५ मे पर्यंतच तूर खरेदी करण्यात येणार असल्याने हमीभाव केंद्रावर शेतक-यांची लगबग दिसून येत आहे.
नाफेडने तूर खरेदी बाबत जाचक अटी लावूनही जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर तब्बल साडेआठ हजार शेतक-यांनी त्या - त्या ठिकाणच्या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र गेल्या वर्षी खरेदी केलेली १ लाख मेट्रीक टना पेक्षा जास्त तूर वेअर हाऊसमध्ये पडून आहे. जागाच नसल्याने खरेदी केलेली तूर ठेवावी कोठे यामुळे जाणिवपूर्वक आधीपासूनच तूर संथगतीने खरेदी केल्याने शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी आत्तापर्यंत फक्त ४ हजार ९ शेतक-याची तूर खरेदी करण्यात आली आहे.
उर्वरीत साडेचार हजार शेतक-यांची तूर खरेदी बाकी आहे. त्यातच नाफेडने अचानक १८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद केल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. परिणामी शेतक-यांना हमीभावापेंक्षा १५०० रूपये कमी दराने तूर विकण्याची वेळ आल्याने शेतक-यांनी संताप होता. तब्बल आठवडा भर तूर खरेदी बंद राहिल्याने आपली तूर खरेदी होईल की, नाही याची चिंता शेतक-यांना सतावत होती. शेतक-यांचा वाढता दबाव बघून नाफेडने बंद केलेली खरेदी २७ एप्रिल पासून पुन्हा सुरू केली. मात्र १५ मे पर्यतच खरेदी करण्याचे निर्देश नाफेडने दिले आहेत. यामुळे नोंदणी केलेल्या शेतक-यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यातच कडक उन्ह, लग्नसराई आणि आठवड्याच्या आलेल्या सुट्या यामुळे देखील तूर खरेदी केंद्रावर शेतकरी गर्दी करू लागले आहेत. तूर खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे. एकूणच कांद्या प्रमाणेच तूरीनेही शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणले.

जालना : ८ कोटी शेतक-यांच्या खात्यात
नाफेडने खरेदी केलेल्या १० कोटी ४७ लाख रूपयांच तूर खरेदी केलेली आहे. ३० एप्रिल पर्यत शेतक-यांच्या बँक खात्यात ८ कोटी रूपये जमा करण्यात आले असल्याची माहिती आहे. उर्वरीत उर्वरीत २ कोटी ४७ लाख रूपये नाफेडकडून येणे बाकी आहे. तसेच जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन या केंद्रावर ३३५ शेतक-याकडून ४ हजार २८० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.

Web Title: Buy 10 million pounds of tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.