चोरीचे सोयाबीन विकून केला कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:32 AM2021-01-25T04:32:12+5:302021-01-25T04:32:12+5:30
परतूर : येथील एका व्यापाऱ्याच्या दोनशे क्विंटल सोयाबीनची परस्पर विक्री करून त्यातून आलेल्या पैशांतून कापूस खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार ...
परतूर : येथील एका व्यापाऱ्याच्या दोनशे क्विंटल सोयाबीनची परस्पर विक्री करून त्यातून आलेल्या पैशांतून कापूस खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. पोलिसांनी एकास टेम्पोसह चारठाणा (ता. जिंतूर) येथून रविवारी ताब्यात घेतले. राजेखॉं पठाण (रा. चारठाणा, ता. जिंतूर, जि. परभणी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
परतूर शहरातील व्यापारी दिनेश होलाणी यांनी धुळे येथील व्यापाऱ्याला दोनशे क्विंटल सोयाबीन एका टेम्पो पाठविले होते. मात्र, ट्रकचालक भीमा कांबळे हा येथे गेलाच नाही. होलाणी यांनी ट्रकमालक सय्यद कैसर सय्यद अख्तर याच्याशी संपर्क केला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी दिनेश होलाणी यांनी नऊ लाख ४९ हजार रुपयांचे सोयाबीन चोरी गेल्याची तक्रार ३० डिसेंबर रोजी परतूर पोलीस ठाण्यात दिली होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना सदरील गुन्ह्यातील आरोपी हा चारठाणा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून चारठाण येथून राजेखॉं पठाण याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने साथीदारांच्या मदतीने सोयाबीन विकून कापूस खरेदी केला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून टेम्पो जप्त केला आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलीस तपास करीत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे करीत आहेत.
फोटो
परतूर पोलिसांनी सोयाबीन चोरी प्रकरणातील जप्त केलेला टेम्पो.