वीजबिल वसुलीसाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:55 AM2021-03-13T04:55:04+5:302021-03-13T04:55:04+5:30
शहागड : वीजबिल वसुलीच्या बाबतीत पिछाडीवर पडलेल्या महावितरणच्या अंबड परिमंडळ कार्यालयाने शहागड व परिसरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या व रजा ...
शहागड : वीजबिल वसुलीच्या बाबतीत पिछाडीवर पडलेल्या महावितरणच्या अंबड परिमंडळ कार्यालयाने शहागड व परिसरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या व रजा आता रद्द केल्या आहेत.
अंबड परिमंडळांतर्गत विशेषत: शहागडसह परिसरात ३१ मार्चपर्यंत मिशन मोडवर वसुली करण्याचे आदेश महावितरणच्या वरिष्ठांनी काढले आहेत. शहागडच्या कनिष्ठ अभियंत्यांना वसुलीबाबत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या मोहिमेत सर्वच तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आले आहे.
शनिवार व रविवार या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठी ५० टक्के अधिकारी व कर्मचारी आळीपाळीने कार्यालयात उपस्थित राहण्याची मुभा तर, उर्वरित ५० टक्के हे वसुली मोहिमेवर फिरत आहेत. ३१ मार्चपर्यंत कोणासही वैद्यकीय कारणाशिवाय रजा देण्यात येणार नाही. ज्यांना दिली गेलीय त्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना देतानाच आठवड्यातून केवळ एकच सुटी सर्वांनी घ्यावी, असे महावितरणच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहागड व परिसरातील महावितरणच्या ३१ मार्चपर्यंत मिशन मोड वसुलीला गती आली असल्याचे दिसून येते.
....
रजेवरील कर्मचाऱ्यांना परत बोलाविले
रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ही रजा रद्द करून मिशन मोडवर वसुली करण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांनी काढले आहेत.
=============
फोटो- शहागडला महावितरण
शहागड येथे वसुली करताना वरिष्ठ तंत्रज्ञ दत्तात्रय देशमुख, महिला तंत्रज्ञ सारिका प्रधान, सहाय्यक रज्जाक शेख, तंत्रज्ञ राम जवळकर आदी.