नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:41 AM2020-12-30T04:41:30+5:302020-12-30T04:41:30+5:30

जालना : तालुक्यात होऊ घातलेल्या ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात मंगळवारी मोठी ...

Candidates rush to fill nomination papers | नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई

नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई

Next

जालना : तालुक्यात होऊ घातलेल्या ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात मंगळवारी मोठी लगीनघाई केली.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकींसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र सादर करण्यास सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज सादर केला नव्हता. दुसºया दिवशी केवळ दोन तर तिसºया दिवशी तब्बल १५३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र सादर केले आहे. चौथ्या दिवशी म्हणजे मंगळवारी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकाºयांनी उपस्थित उमेदवारांकडून सुरळीतपणे नामनिर्देशनपत्र दाखल करून घेतले. नायब तहसीलदार निवडणूक दिलीप सोनवणे यांनी वेळोवेळी उपस्थितांना मार्गदर्शक सूचना दिल्या. पॅनलप्रमुखांनी महिला उमेदवारांना विशेष गाड्यातून आणले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकींची चुरस चांगलीच वाढली असल्याचे दिसून येत आहे. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांनी सांगितले की, २३ डिसेंबरपासून निर्देशन पत्र सादर करणे सुरू झाले. सुट्ट्यांच्या दिवशीही तहसील कार्यालय सुरू ठेवण्यात आले. नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी साडेपाच वाजेनंतर जे उमेदवार तहसील कार्यालयात उपस्थित आहे, अशा उमेदवारांना टोकण देऊन उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येईल. परिविक्षाधीन तहसीलदार शितल बंडगर, नायब तहसीलदार निवडणूक दिलीप सोनवणे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.

शेवटच्या दिवशी आॅनलाईन आणि आॅफलाईन स्विकारले जाणार अर्ज

आॅनलाईन नामनिर्देशन पत्र सादर करताना येणाºया तांत्रिक अडचणी लक्षात घेता, राज्य निवडणूक आयोगाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करणार्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Candidates rush to fill nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.