कार अपघातात चालक जागीच ठार; घोडा, बैल जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:47 AM2018-10-13T00:47:43+5:302018-10-13T00:48:23+5:30
भोकरदन - जालना रोडवरील सोयगाव देवी पाटी जवळ काका पेट्रोल पंपासमोर भरधाव येत असलेल्या स्विफ्ट कारने देवीच्या दर्शनावरून परत येत असलेल्या घोडा व बैलाच्या गाडीला ठोस दिल्याने कारचालकासह बैल, घोडा ठार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन - जालना रोडवरील सोयगाव देवी पाटी जवळ काका पेट्रोल पंपासमोर भरधाव येत असलेल्या स्विफ्ट कारने देवीच्या दर्शनावरून परत येत असलेल्या घोडा व बैलाच्या गाडीला ठोस दिल्याने कारचालकासह बैल, घोडा ठार झाले.
व घोडा गाडी चालक जखमी झाला आहे़ उमेश गणपत हळे (२७, रा़ मानकेश्वर ता़ जिंतूर जि़ परभणी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की ११ आॅक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान नांजा येथील़़ शिवाजी साहेबराव मोरे (रा. नांजा) हे घोडा व बैलाच्या गाडीत सोयगाव देवी येथील देवीचे दर्शन करून गावाकडे जात असताना भोकरदनकडुन जालन्याकडे जाणारी स्विफ्ट कार (क्र. एम.एच. २२, यू ४६८४) या गाडीने घोडा गाडीला समोरा-समोर धडकली. त्यात कारचालक उमेश हळे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी होऊन तो जागीच ठार झाला. तसेच गाडीला जुंपलेला घोडा व बैल सुद्धा जागीच ठार झाले. तर घोडागाडी चालक गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात देवीच्या दर्शनावरून परत येणाऱ्या भक्तानी पाहिला तेव्हा त्यांना मदत कार्य करण्यात आले. मात्र, कार चालक व घोडा व बैल जागीच ठार झालेले असल्याने पशूपालकास भोकरदन ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
श्रीरंग नामदेव काकडे (रा. मानकेश्वर, ता. जिंतुर) यांच्या तक्रारी वरून मयत कारचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे तपास करत आहेत.