निवडणुकीची कामे काटेकोरपणे पार पाडा -दावणगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:17 AM2020-12-28T04:17:17+5:302020-12-28T04:17:17+5:30
आंबा येथे कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण परतूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची कामे काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना नायब ...
आंबा येथे कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण
परतूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची कामे काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना नायब तहसीलदार विजय दावणगावकर यांनी दिल्या. आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयात कर्मचाऱ्यांसाठी रविवारी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.
परतूर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत. या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पुढे दावणगावकर म्हणाले की, निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रत्येकाने आपल्याकडे दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पडावी. काही अडचणी आल्यास तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाशी संपर्क साधावा. आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार धनश्री भालचीम, संतोष पवार, व्ही.के. दंडेवाड, मोहमद सुफियान, ए.के. टाकरस, विद्यासागर ससाने, एस.बी. लोहगावकर, कृष्णा सोनवणे, सतीश निलेवाड, शेंडगे आदींची उपस्थिती होती.
५० कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणाला दांडी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामासाठी ७१२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आंबा येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणास ६६२ कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यातील ५० कर्मचारी गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
फोटो
परतूर येथे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार विजय दावणगावकर, नायब तहसीलदार धनश्री भालचीम व इतर.