अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:28 AM2021-04-15T04:28:57+5:302021-04-15T04:28:57+5:30
जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौफुली परिसरात सदर बाजार पोलिसांनी सापळा रचत एका कारमधून अवैधरित्या नेला जाणारा २०० देशी ...
जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौफुली परिसरात सदर बाजार पोलिसांनी सापळा रचत एका कारमधून अवैधरित्या नेला जाणारा २०० देशी दारू बाटल्यांचा बॉक्स आणि अन्य साहित्य जप्त केले. यावेळी कारची झडती घेतली असता, हा अवैध साठा आढळला. पोलिसांनी कारसह दारू जप्त केली असून, याची कारसह किंमत ही पाच लाख रूपये आहे. कोरोनामुळे रात्रीची गस्त पोलिसांनी वाढवली आहे. जालन्यातील चारही चौफुल्यांवर वाहनांची कसून झडती घेतली जात आहे. मंठा चौफुली परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका स्विफ्ट कारमधून पोलिसांनी राजूर येथील एका हॉटेलमध्ये पोहोचत्या करण्यासाठी नेल्या जात असलेला देशी दारूच्या २०० बाटल्या असलेला बॉक्स जप्त केला आहेे. याप्रकरणी (एमएच २० सीपी ५५५४) या कारसह संतोष सुभाष जैस्वाल याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी हा जालना शहराजवळील इंदेवाडी परिसरातील असून, ही दारू त्याने राजूर येथील किशोर मांगीलाल जैस्वाल यांच्या हॉटेलमध्ये नेण्यासाठी नेर येथील अशोक रामनारायण जैस्वाल यांच्याकडून आणल्याचे सांगितले.
याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पाेलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार परशुराम पवार, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, वैभव खोकले, इरशाद पटेल, मंगेश मोरे यांनी केली.