जालना जिल्हाभरात हिंदी दिवस उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:15 AM2019-09-16T00:15:37+5:302019-09-16T00:16:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालयांमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री लालचंद सकलेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्येहिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री लालचंद सकलेच्या स्कूल, जालना
जालना : श्री लालचंद सकलेच्या स्कूलमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका वैशाली सहाने, जितेंद्र चौधरी, जयश्री तडका यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कविता, हास्यव्यंग, भाषण करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
श्री सरस्वती भुवन हायस्कूल, जालना
जालना : श्री सरस्वती भूवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक पी. टी. आंधळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तुषार आहिरे, जयमाला सिंदखेडकर, मिनाक्षी पोलास यांची उपस्थिती होती. यावेळी कविता, नाटक, चुटकुले व भाषणे इ. सर्व बाबी हिंदीतून सादर करण्यात आल्या. यावेळी उषा जाधव, टी.पी. अहिरे, जे. के. सिंदखेडकर, एम. जी. पोलास, के. जी. भालेराव यांची उपस्थिती होती.
डायनामिक शाळा, राजूर
राजूर : येथील डायनामिक इंग्लिश स्कुल व खरात मामा माध्यमिक विद्यालयात हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव गणेश खरात यांनी मार्गदर्शन केले. रामेश्वर नागवे, अश्विनी खरात यांनी कविता व कबीर यांचे दोहे गात मनोगत व्यक्त केले. प्राचार्य शिवाजी पाटील, जनार्दन पवार, उदय ठाकूर, प्रणिता चव्हाण, संतोष कांबळे उपस्थित होते.
भोकरदन : येथील पायोनिअर इंटरनॅशनल सी.बी.एस.ई स्कूल व एस.बी.आय. बँकेच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. गत पंधरा दिवस स्कूलमध्ये हिंदी पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.