जागतिक आदिवासी दिन केला साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:34 AM2021-08-12T04:34:04+5:302021-08-12T04:34:04+5:30
ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळेचे आयोजन जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळा घेण्यात आली. ...
ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळेचे आयोजन
जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी शेतीशाळा समन्वयक नंदकिशोर पुंड यांनी कीटकनाशक फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच फवारणीची सुरक्षा किट घरच्या घरी कशी तयार करावी याविषयी प्रात्यक्षिक दाखवले शेतीशाळा प्रशिक्षक मुकुंद ढवळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शत्रू कीटक व मित्र कीटक यांची ओळख करून जैविक कीटकनाशकांची फवारणी करून मित्र किडींची जोपासना करण्याविषयी मार्गदर्शन केले तसेच कृषी सहायक वानखेडे यांनी विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.
पदोन्नती बद्दल पवार यांचा सत्कार
जालना : सदर बाजार पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल परशुराम पवार यांची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष संदीप वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता मयुरी अग्रवाल, डीबी पथकाचे प्रमुख गणेश झलवार, रामप्रसाद रेंगे उपस्थित होते
धावडा परिसरातून पूरग्रस्तासाठी मदत
जालना : पूर तसेच नैसर्गिक संकटात सापडलेल्यांसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील धावडा परिसरातील ग्रामस्थांनीही पुढाकार घेत धान्य संकलन केले. परिसरातील धावडा, पोखरी, विझोरा, वालसांवगी, जाळीचादेव, येथील महिला बचत गटांनी १० क्विंटल धान्य जमा करून मदत पाठवली आहे. यावेळी सरपंच बोराडे, गटाचे समन्वयक पवार, बचत गटाच्या सदस्या आदी उपस्थित होते यावेळी जमा झालेल्या धान्याची पॅकिंग करून हे धान्य पुढे पाठवले जाणार आहे.
जांबसमर्थ येथे वृक्षांची लागवड
जांबसमर्थ : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील अंबड - पाथरी राज्य महामार्गावरील संत रामदास स्वामी स्मृतीवणात समर्थ मंदिर ट्रस्टच्या वतीने क्रांतिदिनाचे औचित्य साधून सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच बाबासाहेब तांगडे, महेश साकळगावकर, सुरेश देशपांडे, धनंजय देशपांडे, अविनाश जहागीरदार, लक्ष्मण तांगडे, अर्जुन गणकवार, डॉ. कृष्णा कोकणे, गुलाब तांगडे, किशोर मुनेमाणिक, रामराव खाडे आदींची उपस्थिती होती.
घनसावंगी शहरातील पथदिवे बंद
घनसावंगी : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी पादचारी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अंधाराचा फायदा घेत अनेकजण भुरट्या चोऱ्या ही करू लागले आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने लक्ष देऊन बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
विस्कळीत सेवेमुळे मोबाईल धारक त्रस्त
परतूर : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा सतत विस्कळीत होत आहे. त्यामुळे एकमेकांना संपर्क साधताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. याचा मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम होत आहे. संबंधितांनी सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे.