भाजपकडून जालन्यात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:39 AM2018-11-30T00:39:15+5:302018-11-30T00:39:44+5:30

जालना : राज्य सरकारने गुरुवारी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केले. याचे वृत्त जालन्यात धडकताच भाजपसह अन्य समर्थकांनी ...

Celebration by BJP in Jalna | भाजपकडून जालन्यात जल्लोष

भाजपकडून जालन्यात जल्लोष

Next

जालना : राज्य सरकारने गुरुवारी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केले. याचे वृत्त जालन्यात धडकताच भाजपसह अन्य समर्थकांनी त्याचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले. जालन्यासह जिल्हाभरात भाजपच्या वतीने संभाजीनगरमधील जिल्हा कार्यालयासमोर फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून स्वागत केले.
भाजपने यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजघटकांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊन हे आरक्षण जाहीर केले आहे. आरक्षण देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही विशेष प्रयत्न केल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने जो लढा उभारला होता, त्याचे हे फलित असल्याचे सांगण्यात आाले. आरक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या ४४ जणांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास भाजपचे सरचिटणीस देविदास देशमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष भाऊसाहेब कदम, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, शहराध्यक्ष सिद्धीविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाढेकर, सतीश जाधव, राजेश जोशी, गोवर्धन कोल्हे, बाबासाहेब कोलते, महेश माळवतकर, अतिक खान, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, महेश निकम, संध्या देठे, गणेश नरवडे, शहर उपाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, डॉ. श्रीकांत सपकाळ, सोपान पेंढारकर, अमोल कारंजेकर, महेश ठाकूर, सुधाकर शिंदे, सुधाकर खरात, सुभाष सले, इम्रान सय्यद, रोषण चौधरी, अमरदीप शिंदे, कैलास गजर, सुखदेव चांदगुडे, सुदाम गवारे, बाळू कावळै, भाऊसाहेब पवार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Celebration by BJP in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.