आडनावावरून ठेवली स्मशानभूमीची नावे; वाचा १५ स्मशाने असलेल्या गावाची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 05:09 PM2019-03-09T17:09:46+5:302019-03-09T17:13:07+5:30

आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल पंधरा स्मशानभूमी आहेत.

Cemetery names kept on the last name; Read the story of a village which having 15 cemetery | आडनावावरून ठेवली स्मशानभूमीची नावे; वाचा १५ स्मशाने असलेल्या गावाची कथा

आडनावावरून ठेवली स्मशानभूमीची नावे; वाचा १५ स्मशाने असलेल्या गावाची कथा

Next
ठळक मुद्देअखेरच्या प्रवासाला तरी अडचण नाही ! कथा तब्बल १५ स्मशाने असलेले पिंपळगाव रेणुकाई गावाची  

- फकिरा देशमुख 

भोकरदन (जि. जालना) : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे स्मशानभूमीचा सुकाळ असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे़ तालुक्यात १५७ गावे असून आजही बहुतांश गावांत स्मशानभूमीसाठी साधे टीनपत्र्याचे शेडसुध्दा नाही. मात्र पिंपळगाव रेणुकाई या आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल पंधरा स्मशानभूमी आहेत. त्यापैकी आठ स्मशानभूमीसाठी बांधकाम करण्यात आले आहे. एक मुस्लिम बांधवांचे कब्रस्तान आहे. सहा ठिकाणी अद्यापही उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत

या गावात अठरापगड जातींचे वास्तव्य असून चांगला एकोपाही आहे. कधीही या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण झालेली नाही.  असे असले तरी या गावात्त जातीपेक्षा आडनावावर स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले आहे.  एकाच समाजासाठी दुसरी स्मशानभूमी जि. प.च्या तत्कालीन सभापती वर्षा देशमुख यांनी २०१३-१४ मध्ये देशमुख समाजबांधवांसाठी स्मशानभूमीचे बांधकाम केले.  त्यानंतर चंद्रकांत दानवे यांच्या निधीतून याच समाजासाठी दुसरी स्मशानभूमी बांधली. 

मराठा समाजाच्या पाच स्मशानभूमी
मराठा समाजाच्या सास्ते, नरवाडे, आहेर, गावंडे, गाडेकर अशा पाच स्मशानभूमी वेगळ्या आहेत. वाणी, बारी, नाथजोगी समाजाच्या आडनावाप्रमाणे दोन, तर ब्राह्मण, दलित, वडार यांच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत.

२०१०नंतर झाले आडनावाप्रमाणे बांधकाम
२०१० पर्यंत कोठेच स्मशानभूमीचे पक्के बांधकाम केलेले नव्हते,  मात्र तत्कालीन जि. प. सभापती मनिष श्रीवास्तव यांनी मराठा समाजासाठी एका स्मशानभूमीचे बांधकाम केले. त्यानंतर जातीपेक्षाही आडनावाप्रमाणे बांधकाम करण्यात आले. या शासनाच्या जागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या नात्याप्रमाणे नागरिक कोणा कुटुंबियाचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करीत होते. नंतर मात्र चित्र बदलत गेले. सध्या केवळ  वडार व न्हावी समाजासाठी स्मशानभूमी नाही. 

Web Title: Cemetery names kept on the last name; Read the story of a village which having 15 cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.