जालन्यात होणार उच्च शिक्षणावर विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:04 AM2018-03-28T01:04:32+5:302018-03-28T11:11:45+5:30
महाराजा अग्रसेन फाऊंडेशनमध्ये सोमवारी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च शिक्षणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
जालना : येथील महाराजा अग्रसेन फाऊंडेशनमध्ये सोमवारी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च शिक्षणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मभूषण बद्रीनारायण बारवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या चर्चात्राच्या आयोजन याबाबत अग्रसेन फाऊंडेशनचे राम अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
उच्च शिक्षणाच्या धोरणात काय सुधारणा करता येईल यावर तज्ज्ञांच्या उपस्थिती चर्चा होणे अपेक्षित आहे. चर्चात्रात तज्ज्ञांच्या मतांचा अहवाल तयार करून उच्च शिक्षण विभागास देण्याचे विचाराधीन आहे. उदघाटन पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आ. राजेश टोपे यांची उपस्थिती राहणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या चर्चासत्रात जालनेकरांनी आवर्जून सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस डॉ. शिवाजी मदन, डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. नारायण बोराडे, संजीवनी तडेगावकर आदींची उपस्थिती होती.