रोहिलागड येथे मुख्याध्यापकांची केंद्रस्तरीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:55 AM2021-03-13T04:55:01+5:302021-03-13T04:55:01+5:30
रोहिलागड : गटशिक्षणाधिकारी व डायट जालना कार्यालयाच्या आदेशावरून व तालुका गुणवता कक्षाने घेतलेल्या स्वाध्यायमाला गोष्टींचा शनिवार व ऑनलाईन शाळा, ...
रोहिलागड : गटशिक्षणाधिकारी व डायट जालना कार्यालयाच्या आदेशावरून व तालुका गुणवता कक्षाने घेतलेल्या स्वाध्यायमाला गोष्टींचा शनिवार व ऑनलाईन शाळा, विद्यार्थी गुणवता संवर्धक उपक्रम या संदर्भात नुकतीच मुख्याध्यापकांची बैठक रोहिलागड केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीस केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते. बैठकीत ‘माझी शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा’ उपक्रम, माझे कार्यालय स्वच्छ कार्यालय, ऑनलाईन क्लासेस, स्वाध्याय उपक्रम, अद्यावत ग्रंथालय, नास परीक्षेची पूर्वतयारी, अस्टाॅर्नामी क्लबची स्थापना करणे इत्यादी बाबींवर चर्चा करून केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अरुण कास्तोडे यांनी केले तर संभाजी सिरसाठ यांनी आभार मानले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी परमेश्वर टकले, नारायण राव, बी. जे. टकले, कोकडे, गवळी आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.