पंचनाम्याच्यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ गायब!, विनयभंग प्रकरणी पोलिसांनी केली तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:01 AM2018-01-05T01:01:26+5:302018-01-05T11:03:19+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या कक्षात जाऊन गुरुवारी तपास अधिका-यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यावेळी ते कक्षात आढळून आले नाही.
जालना : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या कक्षात जाऊन गुरुवारी तपास अधिका-यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यावेळी ते कक्षात आढळून आले नाही.
सीईओ चौधरी यांच्यावर येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात बुधवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील एका महिला अधिका-याच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी सांगितले, की दुपारी दोन शासकीय पंचांसोबत मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनात घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कक्षात नव्हते. सायंकाळी पुन्हा जिल्हा परिषद कार्यालयात गेल्यानंतरही ते दिसले नाहीत. त्यांना ताब्यात घेतले जाईल.