शिक्षकांवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:55 AM2018-03-09T00:55:43+5:302018-03-09T00:55:53+5:30
येथील जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत मागास प्रवर्गातल्या ८८ शिक्षकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी निमा आरोरा यांनी गुरुवारी नोटिसा बजावल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत मागास प्रवर्गातल्या ८८ शिक्षकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी निमा आरोरा यांनी गुरुवारी नोटिसा बजावल्या आहेत. येत्या सोमवारपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास आपली सेवा समाप्त करण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले आहे.
मागास प्रवर्गातून शासन सेवेत दाखल झाल्येल्या कर्मचाºयाना जातीच्या प्रमाणपत्राची जात पडताळणी समितीकडून वैधता तपासून घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक वर्षांपासून मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक म्हणून काम करणा-या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गातील ८८ शिक्षकांनी अनेक वर्षांपासून जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे १२ मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास जातीचा दावा सिद्ध करू शकत नाही, असा ठपका ठेवून आपली सेवा समाप्त करण्यात येईल, असे नोटिसीत म्हटलेले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासप्रवर्ग या जातींमधील व्यक्ती आरक्षणाच्या आधारे शासन सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या जातीचे दावे अवैध ठरल्यास त्यांचे शासकीय सेवेत संरक्षण ठरत नाही, या सर्वोच्च सहा जुलै २०१७ च्या निर्णयाचा उल्लेखही नोटिसीत करण्यात आला आहे. नोटिसा दिलेल्यामंध्ये भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक ६३ शिक्षकांचा समावेश आहे. या नोटिसांमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वुर्तळात खळबळ उडाली आहे. तीन दिवसात जात वैधता प्रमाणपत्र कसे मिळविणार हा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
यांना पाठवल्या नोटिसा, तर सेवा होणार समाप्त
इम्रानखान मुसूदखान पठाण, बालाजी गोविंदराव परतवाड, दशरथ उत्तमराव चाफलवाड, ज्योती कन्हैय्यालाल बसवे, संग्राम कन्हैय्यालाल बसवे, समाधान अर्जुन सोनुने, नीलकंठ गजानन निपाने, श्रीराम बापू गहरे, रंजिता हिरास्वामी नीलवंत, बालाजी गोविंदराव येवते, सुखदेव जानूबा सोनुने, दिलीप पंडितराव सोनवणे, नारायण नामदेव इंगळे, गंगा सायन्ना पोलास, लता नारायण दांडगे, काशिनाथ सीताराम दांडगे, दिलीप भीमराव पाडळे, काशिनाथ रामराव सोनुने, समिउल्लाह मसाखान पठाण, ज्ञानेश्वर सदाशीव बाचकलवाड, अशोक रामभाऊ हारके, कृष्णा भीमराव सुराशे, राजेंद्र पोपटराव ठाकूर, गिरीधर सुगनसिंग राजपूत, अनिता भुजंगराव गौंड, तुकाराम लक्ष्मीकांत जाधव, सदाशीर भोणाजी राव, राजेंद्र आसाराम राव, किसन नाथराम इरमले, विलास गिताराम इरले, सुरेश पोशेट्टी पेडिवार, अशोक नारायणराव सुदेवाड, गुलाबखॉ बिसमिल्लाखॉ पठाण, ए. के. अरदडे, संतोष नामदेव भाट, नागनाथ गंगाधर मुपडे, आसाराम आंबादास रंगे, बालाजी मारोती पिटलेवाड, राजेश जनार्धन लोखंडे, सुरेश अर्जुनराव तोटे, राजूर बापूराव चिंचलवाड, विष्णू तुकाराम तोटे, पुंजाराम नारायण बोमटे, रमेश विश्वनाथ रावलोड, पिराजी भुजंगा गोदलवाड, भैय्या मथुरा जैस्वाल, रत्नाकर देवराव गवळी, केशव लक्ष्मण दांडगे, विष्णू शामराव सोनवणे, कैलाश कोंडिबा चंडोल, सुनील लालचंद मोरे, सखाराम लक्ष्मण दांडगे, धोंडू श्रीराम दांडगे, सोमनाथ कडूबा सपकाळ, रघुनाथ रानुबा पाडळे, सुखदेव विठ्ठल सपकाळ, शेनफडू नामदेव साळवे, विजयकुमार तात्याराव माळी, विठ्ठल त्र्यंबक गवळी, समाधान पुंंडेलिक सोनुने, ज्ञानेश्वर फकिरा चंडोळ, पंडित विठोबा तायडे, प्रभू हरिबा दांडगे, देविदास सांडू पाडळे, लक्ष्मण जम्मन पाडळे, सुभाष शंकरराव पाडळे, शंकर रामदास बिºहाडे, दिलीप कुंडलिक शेवाळे, समाधान कोंडिराम शेवाळे, ज्ञानेश्वर माधवराव जाधव, संगीता संतोष जाधव, कौतिक बयाजी चंडोल, शालिग्राम पिरण सावळे, लिलाधर सुरेश सपकाळे, विनोद मनोहर निखारे, गणेश भागाजी चंडोल, धनराज कुंडलिक सोनुने, राजेंद्र हरिभाऊ गवळी, युवराज साहेबराव जाधव, दीपक नामदेव सोनवणे, भीमराव पंडित ठाकूर, भगवान यमाजी गवळे, दिलीप सुखदेव सोनवणे, सुभाष उत्तमराव तारू, कौतिकराम राजराम फोलाने, सुभाष रंगनाथराव गवळी, किशोर मानिकराव निमजे, गुलाब भिमराव इंगळे यांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती सीईओ आरोरा यांनी दिली.