चाचा नेहरू बालमहोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:09 AM2017-12-22T01:09:28+5:302017-12-22T01:09:45+5:30
महिला व बालविकास विभागाच्या वतीने चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महिला व बालविकास विभागाच्या वतीने चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. लोंढे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष प्रकाश इंगळे, बी. जे. मुंडे यांची उपस्थिती होती .
जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, अनाथ व निराधार बालंकाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून बालमहोत्सवासारखे कार्यक्रम बालकांमधील कलागुणांना वाव मिळवून देण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे. बालकांनी अशा संधींचा पुरेपुर उपयोग करून घ्यावा. तसेच शहरात असलेल्या निरीक्षण गृह, बालगृहांमध्ये सोलार व आरओ फिल्टरसाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी जोंधळे यांनी यावेळी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक लेखाधिकारी टी. व्ही. निर्मळ, परीविक्षा अधिकारी बी. ए. कणगरे, परीविक्षा अधिकारी ए. ए. राठोड, एस. ए. पवार, एन. ए. काकडे, अशोक भुसारी आदींनी परिश्रम घेतले.