पाणीचोर शोधण्याचे पालिकेसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:25 AM2018-01-11T00:25:15+5:302018-01-11T00:25:18+5:30
हरात ६० ते ६५ हजार मालमत्ता असताना केवळ २२ हजार नळजोडणी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. उर्वरित जोडण्या या अवैध असल्याचे अधिकारी मान्य करतात. मात्र या शोधणार कशा, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात ६० ते ६५ हजार मालमत्ता असताना केवळ २२ हजार नळजोडणी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. उर्वरित जोडण्या या अवैध असल्याचे अधिकारी मान्य करतात. मात्र या शोधणार कशा, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
पालिकेच्या वतीने शहरात काही महिन्यांपूर्वी नव्याने सर्वेक्षण करून मालमत्तांची माहिती संकलित करण्यात आली. या मालमत्तांना नव्याने कर आकारले जात आहे. असे असले तरी नळजोडणी संख्या अत्यंत कमी असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. एकीकडे खाजगीत अधिकारीही अवैध नळजोडण्यांबाबत चिंता व्यक्त करतात. तर दुसरीकडे पालिकेचे काही कर्मचारीच यामध्ये सहभागी असल्याचे दिसून येते. त्यांच्या परवानगीशिवाय नळजोडणी घेण्याची हिंमत नागरिकांमध्ये नाही. तसेच अनेक ठिकाणी जलवाहिनी अंतर्गत असल्याने त्या शोधण्याचे आव्हान अधिका-यांना पेलावे लागणार आहे. अन्यथा हा केवळ फार्स ठरून पालिकेचे उत्पन्न काही वाढणार नाही.
वैधपेक्षा दुप्पट जोडण्या अवैध आहेत.यावर पालिकेत अनेक बैठकांत मंथन झाले. पण पुढे काही होऊ शकले नाही. त्यातच नव्याने अंथरण्यात येणा-या जलवाहिनीवर किती जोडण्या देण्यात येत आहे. याचा तपशील अधिकाºयांना दिला जात नाही. त्यामुळे अवैध जोडणी देणे अजूनही सुरूच असल्याचे वास्तव त्या त्या ठिकाणी गेल्यानंतरच अधिका-यांना कळू शकणार आहे.