चंदनझिरा पोलिसांकडून मोटारसायकलचोर टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:58 AM2018-12-11T00:58:17+5:302018-12-11T00:58:41+5:30
मोटार सायकल चोरीच्या घटनेने पोलिसांसमासेर एक नवीन आव्हान उभे केले आहे. यातूनच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मोटासायकल चोराला जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : मोटार सायकल चोरीच्या घटनेने पोलिसांसमासेर एक नवीन आव्हान उभे केले आहे. यातूनच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मोटासायकल चोराला जेरबंद केले. त्यासाठी बनावट ग्राहक बनून मोठ्या शिताफीने चोरट्याला अटक केली.
या विषयी मिळालेली माहिती अशी की, चंदनझिरा पोलीस ठाण्यात ३१ आक्टोबरला सुभाष गाडेकर यांची नवीन दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. यावरून अन्य दुचाकी चोरांचा माग काढताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार करमाड येथे एक इसम विना क्रमकांची दुचाकी अत्यंत कमी किंमतीत विक्री करत असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेत, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी चंदनझिरा पोलिसांना बनावट ग्राहक बनवून त्यांच्याकडे पाठविले. सोमवारी दुपारी हा व्यवहार सुरू असतानाच चंदनझिरा पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी बनावट ग्राहक बनून संबंधितास खरेदी करण्याचे आमिष दाखविले. त्याने त्याचे नाव सोनाजी जयंत चौधरी (रा. शेलूद ता. भोकरदन) असे सांगितले. लगेचच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने अन्य मोटार सायकलची चोरी कशी केली याची कबुली दिली. यावरून त्या मोटार सायकल जप्त केल्या असल्याचे पवार यांनी सांगितले. जवळपास सात दुचाकी जप्त केल्या