अंगारकीनिमित्त वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:15 AM2018-12-23T01:15:58+5:302018-12-23T01:16:23+5:30
अंगारकी चतुर्थीनिमित्त रविवारी हजारों भाविक राजूर येथे गणपतीच्या दर्शनासाठी जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी भोकरदन चौफुली येथून राजूर, भोकरदनकडे जाणाऱ्या जड वाहनधारकांनी (एसटी बसेस व भक्तांची वाहने सोडून) आपली वाहने देऊळगाव राजा, जाफराबाद, माहोरा, भोकरदन मार्गाने न्यावी.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंगारकी चतुर्थीनिमित्त रविवारी हजारों भाविक राजूर येथे गणपतीच्या दर्शनासाठी जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी भोकरदन चौफुली येथून राजूर, भोकरदनकडे जाणाऱ्या जड वाहनधारकांनी (एसटी बसेस व भक्तांची वाहने सोडून) आपली वाहने देऊळगाव राजा, जाफराबाद, माहोरा, भोकरदन मार्गाने न्यावी.
भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््यापासून राजुर, जालन्याकडे येणा-या जड वाहनधारकांनी माहोरा, जाफराबाद, देऊळगाव राजा मार्ग यावे. रविवारी १० वाजेपासून ते २६ डिसेंबर पर्यंत हे बदल करण्यात आले.याची दखल वाहनचालकांनी घ्यावी असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.