नगरपालिकेतील आर्थिक अनियमितता तपासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:53 AM2017-12-20T00:53:02+5:302017-12-20T00:53:07+5:30

निकष डावलून करण्यात आलेल्या कामांमुळे सर्वसामान्यांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी विशेष लेखा परीक्षण अधिका-यांकडे मंगळवारी केली

Check the financial irregularities of the municipality | नगरपालिकेतील आर्थिक अनियमितता तपासा

नगरपालिकेतील आर्थिक अनियमितता तपासा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगरपालिका केंद्र व राज्य शासनाच्या निधीसह मालमत्ता व पाणीपट्टीतून मिळणा-या उत्पन्नातून शहरात विकास कामे केली जात आहेत. मात्र, या कामांमध्ये अनियमितता झाली असून, निकष डावलून करण्यात आलेल्या कामांमुळे सर्वसामान्यांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी विशेष लेखा परीक्षण अधिका-यांकडे मंगळवारी केली आहे.
या संदर्भात शिवसेनेचे पालिकेतील गटनेते विष्णू पाचफुले यांनी विशेष लेखा परीक्षण अधिका-यांना निवेदन दिले आहे.
वित्त आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांचे पालन पालिकेने केलेले नाही, सक्षम मान्यता नसताना नगरपालिका फंडातून कामे करणे, प्राप्त कराचे नियोजन न करता ठेकेदार व पुरवठादारांची देयके काढणे, बांधकाम, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, नगररचना, पाणीपुरवठा विभागांमार्फत होणाºया कामांच्या निविदा काही लोकांचे आर्थिक हित जोपासण्याच्या हेतूने ठराविक लोकांना देऊन पालिकेचे नुकसान, जाहीर लिलावात ठराविक लोकांना फायदा होईल यासाठी अनियमितता, रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा कामांचा दर्जा इ. कामांमध्ये मोठी अनियमितता झाल्यामुळे सखोल चौकशी करावी, तसेच दोषी आढळणा-यांवर कडक कारवाई करावी, या मागण्या निवेदनात आहेत. निवेदनावर नगरसेवक रावसाहेब राऊत, संदीप नाईकवाडे, विजय पवार, अशोक पांगारकर, निखिल पगारे, जयप्रकाश परदेशी, वैशाली ठोसर, उषा पवार, रंजना गोगडे, मीना घुगे, वैशाली जांगडे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Web Title: Check the financial irregularities of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.