वीज वितरणचे ५९ लाख रुपयांचे धनादेश बाऊन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:46 AM2018-11-14T00:46:02+5:302018-11-14T00:46:22+5:30

थकीत वीज वीज बिल भरण्यासाठी वीज वितरणकडे अनेक ग्राहकांनी दिलेले धनादेश न वटल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Cheques worth Rs 59 lakhs of electricity distribution bounce | वीज वितरणचे ५९ लाख रुपयांचे धनादेश बाऊन्स

वीज वितरणचे ५९ लाख रुपयांचे धनादेश बाऊन्स

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : थकीत वीज वीज बिल भरण्यासाठी वीज वितरणकडे अनेक ग्राहकांनी दिलेले धनादेश न वटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एकीकडे हे धनादेश न वटल्याचे सांगितले जात असले तरी, हे सर्व होत असताना धनादेश न वटल्याची माहिती बँकेकडूनही बऱ्याच उशिराने मिळाल्याने सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालना येथील वीज वितरण कंपनीकडून वीज बिलाची वसूली करण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन केले होते. या जालन्यातील केंद्रावर अनेक ग्राहकांनी त्यांचे विजबिल भरण्यासाठी धनादेश दिला होता. परंतु तो धनादेश न वटता आणि वीजबिलापोटी दिलेली रक्कम संबंधित बँकेच्या खात्यावरून वीज वितरणच्या खात्यात वर्ग केल्याचे रेकॉर्ड मिळत होते. त्यामुळे याचा गोंधळ आणखी वाढला आहे. सध्या सर्वत्र मोबाईल बँकींग व्यवस्था असल्याने खात्यात दुसरीकडून रक्कम जमा झाल्यास लगेचच मॅसेज येतो आणि खात्यातून दुस-याला रक्कम वर्ग केली असल्यास त्याचाही मॅसेज येतो.
असे असातना वीज वितरण कंपनीत जवळपास २४० पेक्षा अधिक धनादेश न वटल्याचे एवढ्या उशीरा कसे लक्षात आले हा संशोधनाचा विषय बनला आहे.
या जालना कार्यालयातील धनादेश घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी येथील स्थानिक अधिका-यांनी वरिष्ठ कार्यालयास कळविल्यानंतर मंगळवारी दोन अधिका-यांचे पथक जालन्यात दाखल झाले होते. त्यांनी सर्व ती कागपत्र स्वत:च्या ताब्यात घेऊन छानबिन सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारात नेमके कोणकोण गुंतले आहे, हे चौकशीनंतरच समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच वीज वितरण कंपनीच्या कारभारावर शंका घेतली जात आहे.
जालना : ट्रान्स्फॉर्मर देतानाही अनेक अडचणी
४अनेक गावातील डीपी जळाल्याने त्या दुरूस्त करून देण्यासाठीदेखील शेतकरी आणि गावकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. कधी डीपी दुरूस्त करण्यासाठी आॅईल नसल्याचे कारण पुढे केले जाते, तर कधी दुरूस्त डीपी देण्यासाठी देखील अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय डीपी मिळत नसल्याची तक्रार नुकतेच जालना दौºयावर आलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत माजी आ.शिवाजी चोथे तसेच शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांनी थेट आरोप केले होते.

Web Title: Cheques worth Rs 59 lakhs of electricity distribution bounce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.