सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या सरकारला खाली खेचा- छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:33 AM2018-10-01T00:33:44+5:302018-10-01T00:33:57+5:30
सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाºयांना नागरिकांनी खाली खेचून त्यांना आपली जागा दाखवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : सर्वसामान्यांच्या प्रगतीत अडथळा आणणाºयांना नागरिकांनी खाली खेचून त्यांना आपली जागा दाखवावी, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले.
अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे शनिवारी मंडलस्तंभावर माजी आ.डॉ. नारायण मुंडे यांनी लिहलेल्या ‘गवसणी आकाशाला ’ या कादंबरीचे प्रकाशन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक विक्रम घुगे, माजी आ. शिवाजी चौथे, धोंडिराम राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ज्ञानदेव बांगर, देवीदास खटके, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बळीराम खटके, सत्संग मुंडे, श्रीमंत खटके आदींची उपस्थिती होती.
लोकसभेत स्व.गोपीनाथ मुंडे व खा.समीर भुजबळ यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी त्या समितीने तुमच्या आमच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. ओबीसींना शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी मंडल आयोगाने शिफारशी केल्या. या शिफारशींना अनेक पक्षासह नेत्यांचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे ग्रामविकास खात्यामार्फत जनगणना करा,असे सांगितले होते. मंडल कमिशन ओबीसींना मिळाल्यानंतर दोदडगाव येथे पहिला मंडल स्तंभ स्थापन करण्यात आला. कुठल्याही कामाला झगडावे लागते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांनी अज्ञान मोडीत काढले. फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढली. त्या काळात कोणालाही शिक्षण मिळत नव्हते. परंतु फुले यांच्या चळवळीने आज मागास समाजाला लिहिता-वाचता येते. सर्व ओबीसींनी एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय निश्चित ध्येय साध्य करता येणार नाही.