छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना न्याय दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:48 AM2018-03-06T00:48:32+5:302018-03-06T00:48:58+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे कुठल्याही जाती-धर्माचा द्वेष न करता शिवरायांचे विचार आचारणात आणावे, असे आवाहन शिवाजी महाराजाचे तेरावे वंशज छत्रपती खा़ संभाजी राजे भोसले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे कुठल्याही जाती-धर्माचा द्वेष न करता शिवरायांचे विचार आचारणात आणावे, असे आवाहन शिवाजी महाराजाचे तेरावे वंशज छत्रपती खा़ संभाजी राजे भोसले यांनी केले.
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे शिवजयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. संतोष दानवे, निर्मला दानवे, रामेश्वरचे चेअरमन विजयसिंह परिहार, उपसभापती भास्कर दानवे, सुरेश बनकर, सभापती कौतिकराव जगताप, विलास आडगावकर, साहेबराव कानडजे, भाऊसाहेब जाधव यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना संभाजीराजे भोसले म्हणले की, जळगाव सपकाळ सारख्या छोट्याशा गावात महाराजांचा उभारलेला हा आश्वरूढ पुतळा सर्वांनी आर्दश घेण्यासारखा आहे. पुतळा उभारल्यामुळे येणा-या काळात त्यांच्या विचारांचे पालन करण्याची जबाबदारी गावातील प्रत्येकावर आहे. यावर्षी महाराजाची जयंती दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीती साजरी करण्यात आली. त्यामुळे महाराजांचे कार्य हे केवळ दिल्लीपर्यंतच नाही तर जगभरामध्ये पोहोचले. खा़ दानवे म्हणाले की, जळगाव सपकाळ या येथूनच कै. माजी आ़ विठ्ठलरावअण्णा यांच्याकडून राजकारण शिकलो. त्यामुळे या गावाशी माझी कायम नाळ जोडली गेली. आ. दानवे म्हणाले, की गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम पूर्ण होऊन काही महिने झाले. पुतळा अनावरणासाठी छत्रपती संभाजी राजे यांनाच आणावे असा आग्रह गावकºयांनी केला होता. त्यामुळे त्यांना निमंत्रण दिले व त्यांनी ते स्वीकारले. यावेळी आऱ ए़सपकाळ, डॉ. हेमंत सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष राजेद्र देशमुख, गोविंंदराव पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सपकाळ, जिल्हापरिषद सदस्य आशा पांडे, मुकेश पांडे, सुनीता सपकाळ, शाकिलराम म्हस्के, संतोष लोखंडे, डॉ. चंद्रकांत साबळे, विंठ्ठल चिंचपुरे आदींची उपस्थिती होती.