मुख्यमंत्री साहेब, बाबांचा पगार वाढवा ना..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:33 AM2019-12-15T00:33:14+5:302019-12-15T00:34:12+5:30

अपुऱ्या पगारामुळे वडिलांना करावा लागणारा ओव्हरटाईम आणि वडिलांची मुलीशी अनेकवेळा न होणारी भेट यामुळे व्यथित झालेल्या धाकलगाव (ता.अंबड) येथील एका चिमुकलीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे

Chief Minister, Raise the salary of my daddy | मुख्यमंत्री साहेब, बाबांचा पगार वाढवा ना..!

मुख्यमंत्री साहेब, बाबांचा पगार वाढवा ना..!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अपुऱ्या पगारामुळे वडिलांना करावा लागणारा ओव्हरटाईम आणि वडिलांची मुलीशी अनेकवेळा न होणारी भेट यामुळे व्यथित झालेल्या धाकलगाव (ता.अंबड) येथील एका चिमुकलीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. बाबांचा पगार वाढवा, त्यानंतर त्यांना ओव्हरटाईम करावा लागणार नाही आणि ते मला शाळेत सोडवायला येतील, अशी अर्त साद त्या मुलीने पत्राद्वारे घातली आहे.
धाकलगाव येथे राहणारी श्रेया सचिन हराळे ही मुलगी अंबड येथील मत्स्योदरी विद्यालयात इयत्ता पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे वडील गेल्या नऊ वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या अंबड आगारात वाहक म्हणून काम करत आहेत. मुलीचे वडील कामानिमित्त सतत बाहेर राहतात. त्यामुळे श्रेया आणि सचिन हराळे यांची भेट दुुर्मिळच असते. वडील कामावरून रात्री उशिरा येतात तेव्हा ती झोपलेली असते. कधी-कधी अनेक दिवस दोघांची भेटही होत नाही.
मात्र, इतर मुलांप्रमाणे आपणही आपल्या वडिलांसोबत खेळावे, त्यांनी शाळेत सोडायला यावे, असे श्रेयाला सतत वाटते. त्यामुळे श्रेया हिने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून आपले गाºहाणे मांडले आहे. कमी पगार असल्यामुळे जास्त पैसे मिळवण्यासाठी बाबांना ओव्हर टाईम करावा लागतो. त्यामुळे ते आपल्याला वेळ देत नसल्याची तक्रार या चिमुकलीने पत्रामध्ये केली आहे. चिमुकलीच्या या पत्रावर मुख्यमंत्री कोणते उत्तर देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
साताºयातील घटना
‘सरकार भिकार आहे. नोकरदारांना मरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पगार वाढत नाही, अधिकारी अधिकार बजावत असतात. पगार तोडका, महागाई मोठी, या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे‘ अशा आशयाची चिठ्ठी लिहून सातारा जिल्ह्यातील दहिवडी आगारात काशीनाथ वसव या चालकाने चार दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
असे आहे पत्र
मा. मुख्यमंत्र्यांना पत्र, आदरणीय मुख्यमंत्री जी, माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे. मी मत्स्योदरी स्कूल अंबड येथे १ ल्या वर्गात शिकते. पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसापासून अंबडच्या बसमध्ये कंडक्टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि उशिरा येतात. मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात ‘सोनू बेटा, ओव्हर टाईम करावा लागतो माझा पगार कमी आहे’. म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीजी, माझी विनंती आहे. तुम्हाला माझ्या पप्पांचा पगार वाढवा ना ! मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील आणि ओव्हर टाइम करणार नाहीत. माझे पप्पा खूप चांगले आहेत.

Web Title: Chief Minister, Raise the salary of my daddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.