निषेधाने गाजला मुख्यमंत्र्यांचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:26 AM2018-11-04T00:26:43+5:302018-11-04T00:27:01+5:30

मुख्यमंत्र्यांचा दौरा अवघ्या २४ तासांत ठरल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Chief Minister visits protest | निषेधाने गाजला मुख्यमंत्र्यांचा दौरा

निषेधाने गाजला मुख्यमंत्र्यांचा दौरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुख्यमंत्र्यांचा दौरा अवघ्या २४ तासांत ठरल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी या बैठकीचे आयोजन करताना पोलिसांनी जो तगडा बंदोबस्त लावला होता, त्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांसह वकील, न्यायिक अधिकाऱ्यांना बसल्याने एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पोलिसांमध्ये आधी शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर नंतर सौम्य लाठीमारात झाल्याने गोंधळात भर पडली.
जिल्ह्यात केवळ ६१ टक्केच पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली होती. त्या पार्श्वभूमीवर पूर्वी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जालना दौºयावर येऊन दुष्काळी स्थितीचा आढावा घ्यावा यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन २४
तासांत त्यांचा दौरा निश्चित करून तसे निर्देश जिल्हाधिका-यांना दिले होते. हे निर्देश मिळताच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने सर्व विभागप्रमुखांना सूचित करून माहिती अपडेट ठेवण्याचे निर्देश दिले होते.
शनिवारी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर १२.२० मिनिटांनी जालन्यात उतरले. त्यानंतर त्यांनी तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जि.प. सदस्य जयमंगल जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्याचा आग्रह धरला.
त्यातूनच भोकरदनचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांच्या सोबत वाद झाला. यातूनच चिडलेल्या पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची धरपकड करून सौम्य लाठीमार केला. यामुळे वातावरण संतप्त झाले होते. जयमंगल जाधव यांना हाताला जबर मार लागला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.
वकिलांनी नोंदवला निषेध
शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने वाहतुकीत बदल केले होते. तसेच न्यायालयत जाण्यासाठीच्या मार्गावरून न्यायिक अधिकाºयांसह वकिलांना प्रतिबंध करण्यात आल्याने मोठी अडचण झाली. यामुळे काही ठिकाणी पोलीस आणि वकिलांमध्ये शाब्दिक वादही झाले. या संदर्भात वकिलांच्या शिष्टमंडळाने प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच न्यायालयाच्या परिसरात सर्वांनी एकत्रित येऊन पोलिसांच्या अरेरावीचा निषेध नोंदविला.
पोलिसांच्या या भूमिकेचा फटका हा पक्षकारांनाही बसला. त्यांना न्यायालयात येताना अनेक अउच्णींना तोंड द्यावे लागले.
निषेध नोंदविणा-यांमध्ये जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक तारडे, अ‍ॅड. सी. डी. देशपांडे, अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. किशोर राऊत, अ‍ॅड. एन. डी. देशपांडे, अ‍ॅड. आर. जी. देशमुख, अ‍ॅड. गजानन मांटे, अ‍ॅड. संजीव गायकवाड, अ‍ॅड. रमेश उंचे, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, अ‍ॅड. शैलेश देशमुख, अ‍ॅड. डी. के. कुलकर्णी, अ‍ॅड. रोहित बनवसकर, अ‍ॅड. सुमित मोरे, अ‍ॅड. प्रज्ञेश कुलकर्णी, अ‍ॅड. दत्तात्रय लिखे, अ‍ॅड. संदीप घुगे, अ‍ॅड. अभिषेक सतकर, अ‍ॅड. दीपिका ढवले, अ‍ॅड. चित्रा वाघ यांच्यासह अन्य वकिलांची यावेळी उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.

 

Web Title: Chief Minister visits protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.