जिल्हा परिषद शाळांत ‘बालरक्षक’ समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:27 AM2020-01-08T00:27:20+5:302020-01-08T00:27:49+5:30

अंबड तालुक्यातील शहागड व परिसरातील १४ शाळांमध्ये ‘बालरक्षकांची’ निवड करण्यात आली.

'Child care' committees in Zilla Parishad schools | जिल्हा परिषद शाळांत ‘बालरक्षक’ समित्या

जिल्हा परिषद शाळांत ‘बालरक्षक’ समित्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेत ‘बालरक्षकांची’ नियुक्ती करण्यात येते. त्याअनुषंगाने अंबड तालुक्यातील शहागड व परिसरातील १४ शाळांमध्ये ‘बालरक्षकांची’ निवड करण्यात आली. या उपक्रमातून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याअनुषंगाने ‘बालरक्षक’ संकल्पना अस्तित्वात आली आहे. यामुळे कधीही शाळेत न गेलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. शहागड केंद्रातील १४ प्राथमिक शाळांसह परिसरातील जिल्हा परिषद शाळांत ‘बालरक्षकांची’ नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शाळातील शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.
या बालरक्षकांना शाळाबाह्य मुले आढळल्यास त्यांना जवळील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला जाणार असून, इतर सुविधाही पुरविल्या जाणार असल्याचे केंद्रप्रमुख रंजित बांगर यांनी सांगितले.
५६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात
शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत ५६ शाळाबाह्य मुले सापडले आहे. कामासाठी व ऊस तोडीसाठी केलेल्या या ५६ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या सोयीनुसार जवळील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला असून, त्यांना सुविधाही पुरविल्या जात आहेत. त्यामुळे अनेक मुले शिक्षणाकडे आकर्षित होत असल्याचे केंद्रप्रमुख रंजित बांगर यांनी सांगितले.
‘बालरक्षक’ संकल्पनेमुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण हमीपत्र दिले जाते. ज्यामुळे शाळाबाह्य मुलांनी काही कारणास्त्व इतरत्र शाळा बदलली तर हमीपत्रामुळे प्रवेश घेण्यास सुलभता येणार आहे.
सोबतच सर्व कागदपत्रांची पूर्तता हमीपत्रात राहणार असल्याने विद्यार्थी कुठेही गेला तरी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे शिक्षण हमीपत्र योजनेची अंमलबजावणी होत आहे.

Web Title: 'Child care' committees in Zilla Parishad schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.