खेळण्यास गेलेला चिमुकला परतलाच नाही, अखेर नदी पात्रात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 06:53 PM2021-10-12T18:53:40+5:302021-10-12T18:56:10+5:30
रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला.
वडीगोद्री (जि.जालना) : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील गल्हाटी नदीत पाय घसरून पडल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आदित्य बालाजी सांगळे (६ रा.पिठोरी सिरसगाव), असे चिमुकल्याचे नाव आहे.
पिठोरी सिरसगाव येथील आदित्य सांगळे हा सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या गल्हाटी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर, ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. आदित्य हा जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
चालकाचे नियंत्रण सुटून कार बंधाऱ्यात कोसळली
नातेवाईकांची भेट आणि देवीच्या दर्शनासाठी मुळगावी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. आज दुपारी २. ४५ वाजेच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने लाडसावंगी जवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात कार कोसळून त्यात चारजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात औरंगाबाद तालुक्यातील करमाड येथील हिवरा-जडगाव रोडवरील जडगाव गावापासून ५०० फुटावर झाला.