उर्फी प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचं समर्थन नव्हतं? बावनकुळेंनी सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 07:21 PM2023-01-21T19:21:44+5:302023-01-21T19:22:03+5:30

उर्फी जावेदच्या तक्रारीची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Chitra Wagh was not supported by BJP in the Urfi case? Chandrashekhar Bawankule said politics | उर्फी प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचं समर्थन नव्हतं? बावनकुळेंनी सांगितलं राजकारण

उर्फी प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचं समर्थन नव्हतं? बावनकुळेंनी सांगितलं राजकारण

Next

जालना/मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणइ सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून सुरू झालेला वाद महिला आयोगापर्यंत गेला. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर मुंबई पोलिसांकडून उर्फीला नोटीस पाठवण्यात आली होती. यासोबतच मुंबई पोलीस आयुक्तांनीही चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस बजावण्यात आली. चित्रा वाघ यांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा राहिला नसल्याचीही चर्चा रंगली. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 

उर्फी जावेदच्या तक्रारीची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 'मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा.' असे ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे, याप्रकरणात चित्रा वाघ यांच्या पाठिशी भाजप समर्थपणे उभा राहिला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यासंदर्भात चंद्रशेखर

बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचे समर्थन नसल्याने त्या कमी पडल्या का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर, भाजपात समर्थक किंवा बेसमर्थक असं काही नाही. चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, ज्या विषयांवर त्यांनी भूमिका मांडली त्यांवर बोलायला त्या सक्षम असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं. 

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची वीज कपात करण्यात आली असल्याचे विचारले असता, लवकरच याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी भेटून चर्चा करणार असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. 

पंकजा मुंडे आमच्या नेत्या

“भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता,” असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी नमूद केलं.
 

Web Title: Chitra Wagh was not supported by BJP in the Urfi case? Chandrashekhar Bawankule said politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.