चुर्मापुरी येथे २४५ लोकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:27 AM2021-04-12T04:27:34+5:302021-04-12T04:27:34+5:30
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणात सहभागी व्हावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने दोन दिवसांपासून वाड्या - वस्तींवर जाऊन जनजागृती ...
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणात सहभागी व्हावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने दोन दिवसांपासून वाड्या - वस्तींवर जाऊन जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शासनाने कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढविला आहे. चुर्मापुरी येथे शनिवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण केंद्राचे उद्घाटन सरपंच साधना हातोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यात २४५ नागरिकांनी लस घेतली आहे. दर शनिवारी चुर्मापुरी येथे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी महादेव मुंडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच साधना भैय्यासाहेब हातोटे, आरोग्य अधिकारी डॉ. महादेव मुंडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अतुल तांदळे, आरोग्य सहाय्यक विजय कांबळे, पी. एस. जोशी, आरोग्य सेविका खैरमोडे, भैय्यासाहेब हातोटे, अख्तर शेख, मुख्याध्यापक कुमार कसाब, श्रीकृष्ण उबाळे, सतीश कदम, सोनाजी शिंदे, अशोक लोणे, दीपक गाडेकर, रमेश सावंत, गुड्डू लोणे, राजू बाबर, राहुल हातोटे, बद्री हातोटे, बबन शिंदे आदींची उपस्थिती होती.
फोटो
चुर्मापुरी उपकेंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच साधना हातोटे, भैय्यासाहेब हातोटे, डॉ. अतुल तांदळे आदी उपस्थित होते.