शहर वाहतूक शाखेचा कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:54 AM2018-09-06T00:54:42+5:302018-09-06T00:55:04+5:30
जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. बुधवारी अचानक केलेल्या वाहन तपासणीमध्ये ८० वाहन धारकांना कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास पंचवीस हजार रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. बुधवारी अचानक केलेल्या वाहन तपासणीमध्ये ८० वाहन धारकांना कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास पंचवीस हजार रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी दिली.
बुधवारी सकाळपासूनच शहराचे नवीन आणि जुना जालना भागात ही वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नवीन जालना भागातील अनेक दुकानांसमोर त्यांच्या नावांच्या पाट्या तसेच लोखंडी पायऱ्या आणि अन्य साहित्य दिसून आले. हे सर्व साहित्य पोलिसांनी एक स्वतंत्र टेम्पो आणून त्या टेम्पोच्या माध्यमातून जप्त केले.
दरम्यान, शहरात जवळच्या ग्रामीण भागात रिक्षाद्वारे येणारी वाहतूक आता केवळ त्या-त्या चौफुलीपर्यंत थांबविण्यात येणार असून केवळ जालन्यातील परवाना धारकांनाच शहरात प्रवेश दिला जाणार असल्याचे काकडे म्हणाले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक के.एस.नाडे, फौजदार बी.के.अंभोरे यांच्यासह वाहतूक शाखेतील अन्य पोलिस कर्मचा-यांचा समावेश आहे.