शहरातील वळण रस्ते उजळणार; केंद्राकडून स्वतंत्र निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:58 AM2021-03-04T04:58:35+5:302021-03-04T04:58:35+5:30

जालना शहराच्या बाहेरून अन्य गावांना जाण्यासाठी वळण रस्ता १९९६ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात झाला आहे. नंतर हा वळण ...

The city's winding roads will light up; Independent funding from the center | शहरातील वळण रस्ते उजळणार; केंद्राकडून स्वतंत्र निधी

शहरातील वळण रस्ते उजळणार; केंद्राकडून स्वतंत्र निधी

Next

जालना शहराच्या बाहेरून अन्य गावांना जाण्यासाठी वळण रस्ता १९९६ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात झाला आहे. नंतर हा वळण रस्ता वाढत्या वाहतुकीमुळे अपुरा पडता होता; परंतु नंतर याचे चौपदरीकरण करण्यात आले. हा रस्ता आधी केवळ अंबड चौफुलीपर्यंतच सिमेंटचा होता; परंतु नंतर मोतीबागेकडून औरंगाबाद चौफुली, तसेच अंबड चौफुलीपासून मंठा चौफुली आणि कन्हैयानगर, भोकरदन चौफुलीमार्गे औरंगाबाद चौफुलीला जोडला आहे.

याचे काम अंतिम टप्प्यात असून, ते काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. या पथदिवे सुरू करण्याच्या कामाचा लवकरच आपण श्रीगणेशा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री दानवे यांनी नमूद केले.

चौकट

लसीबाबत गैरसमज नको...

अनेक जण कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत; परंतु हे लस घेतल्याने नव्हे तर मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळल्यानेच होते. लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, आपणही ती बुधवारी घेतली आहे. हा आपला पहिला डोस होता. आता दुसरा डोस २८ दिवसांनंतर घेणार आहोत. लसीबाबतचे सामान्य लोकांमधील गैरसमज चुकीचे असून, लस उपयुक्त असून, त्याने तुमची प्रतिकारशक्ती निश्चितच वाढेल, यात शंका नाही.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे.

Web Title: The city's winding roads will light up; Independent funding from the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.