पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू; केंद्र स्तरांवर बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:14 AM2021-01-24T04:14:20+5:302021-01-24T04:14:20+5:30
अंबड तालुक्यात शासकीय, निमशासकीय अशा एकूण ३०७ शाळा आहेत. कोरोनामुळे बंद असलेले नववी ते बारावी दरम्यानचे वर्ग मध्यंतरी सुरू ...
अंबड तालुक्यात शासकीय, निमशासकीय अशा एकूण ३०७ शाळा आहेत. कोरोनामुळे बंद असलेले नववी ते बारावी दरम्यानचे वर्ग मध्यंतरी सुरू झालेले आहेत. आता पाचवी ते आठवी हे वर्ग सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. वर्ग सुरू होणार असल्याने शाळांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कोरोनामुळे विद्यार्थी व शिक्षकांची तापमान मोजूनच त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. या बरोबरच शाळेत मास्क व हात धुण्यासाठी पाणी, साबण याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षित अंतरासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन फूट अंतरावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांनी संमतीपत्र भरून देणे बंधनकारक आहे. शाळेत प्राधान्यक्रमाणे गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांवर भर द्यावा, तर इतर विषय ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांनी शिकवावेत, अशा सूचना शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.