१३ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:40 AM2019-09-02T00:40:36+5:302019-09-02T00:41:28+5:30

१३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत

Code of Conduct in the State starting from September 13 | १३ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता

१३ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभेची लगीनघाई आता तोंडावर आली आहे. येत्या १३ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, युतीसह सर्व राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. भाजपला सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रसचे अनेक मातबर नेते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. शनिवारीच चार आमदारांनी आपली भोकरदन येथील निवासस्थानी भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात केला.
येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ओबीसी समाजातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, कल्याण दळे, राजेंद्र राख, शेख महेमूद, प्रा. भगवानसिंग डोबाळ, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ.संजय राख, आदींची उपस्थिती होती. यावेळी गोदावरी विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, लक्ष्मण वडले यांची उद्योग महामंडळाच्या सदस्यपदी तर ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अविनाश ठाकरे, डॉ. भागवत कºहाड यांची मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल तर प्रवीण घुगे यांची बालक हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी माजी आ. नारायण मुंडे हे होते. दानवे म्हणाले, आमचे आणि शिवसेनेचे ठरलेले आहे. त्यामुळे विरोधकांनी कुठलेही विचार मनात आणू नयेत. लोकसभा निवडणुकीत माझ्यात आणि अर्जुन खोतकरांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. परंतु त्यात तथ्य नव्हते, ती एक नाटकीय घडामोड होती. त्या अंकावर आता पडदा पडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात असून, शनिवारी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भेट घेतल्याचेही दानवेंनी सांगितले. दानवेंनी निवडणूक आचारसंहिता कधी लागेल हे निवडणूक आयोगाच्या आधीच सांगितल्याने निवडणूक कार्यक्रम फुटला की काय, अशी चर्चा होती. सूत्रसंचालन गजानन गिते यांनी केले.

जातनिहाय जनगणना करणार
देशासह महाराष्ट्रात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना गेल्यावेळीच जातनिहाय जनगणना होणे अपेक्षित होते, परंतु त्यावेळी सरकार आमचे नव्हते. आता सरकार आमचे असून, २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत आम्ही जातनिहाय जनगणना करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाश्वासन यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिले.

Web Title: Code of Conduct in the State starting from September 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.