दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘मुकाबला दुष्काळाचा’ मोहीम हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:29 AM2019-05-06T00:29:49+5:302019-05-06T00:30:02+5:30
लना जिल्हा तीव्र दुष्काळाने होरपळला असून या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना शहरातील सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने ‘मुकाबला दुष्काळाचा’ ही मोहीम सुरु केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्हा तीव्र दुष्काळाने होरपळला असून या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना शहरातील सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने ‘मुकाबला दुष्काळाचा’ ही मोहीम सुरु केली.
सर्वप्रथम जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक गावांचा दौरा करुन चारा, पाणी, या समस्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या भावनेतून जिल्हाप्रमुखांनी जाणून घेतल्या व आता मागील महिन्यांपासून या समस्यांवर उपाययोजना करीत आहेत. या उपाययोजना करतांना तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या पाहेगाव, पारेगाव, बाजीउम्रद, मानेगाव तांडा, पोखरी सिंदखेड, राममुर्ती, वुंष्ठभेफळ, वरखेडा, वाघ्रुळ आदी गावांत पाणी समस्यांवर उपाय म्हणून बोअरवेल घेवून दिले. तसेच अनेक गावांतील जनावरांसाठी चारा, पाणी व पाणी साठविण्यासाठी २ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत रविवारी जालना शहरातील दानशुर उद्योजक कैलास लोया यांच्या सहकार्याने व मदतीने घेण्यात आलेल्या बोअरवेलच्या पाण्याचे जलपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मानेगावचे माजी सरपंच अशोक हंडे, माजी सैनिक एकनाथ हंडे, किसान राठोड, गणेश पवार, विठ्ठल पडूळ, रामधान राठोड, सुभाष राठोड, लालीराम राठोड, विठ्ठल राोड, बंडु पवार, ज्ञानेश्वर राठोड, मोहन पवार, विकास मगर, प्रल्हाद पवार, सुभाष पवार, केलास राठोड, नंदु राठोड, दिलीप रा
ठोड, संजय राठोड, राममुर्ती येथील सरपंच कैलास गिराम, बंडु केळकर, निवृत्ती मुळे, विष्णु मगर, बाबुराव राऊत, गणेश मगर, लक्ष्मण सातपुते, जलाल मुन्नेवाले, राधाकिसन राऊत, दत्तु मगर, सत्यनारायण मगर, अशोक गिराम, संतोष राऊत, ज्ञानेश्वर राऊत, परमेश्वर चौधरी आदी गावकऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती.
दानाचा सदुपयोग
यावेळी बोलतांना उद्योजक कैलास लोया म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी देणगी देत असतो. परंतु नंतर त्याचा वापर कसा होतो, याचे ज्ञान आम्हाला नसते. परंतु मुकाबला दुष्काळाचा या मोहिमेस मदत केल्यामुळे आम्ही दिलेले दान हे सत्पत्री गेल्याचा आनंद अनुभवयास मिळत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती काही अंशी थांबविल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी या उपक्रमाचे कौतूकही केले.
गावक-यांना दिलासा
या मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेले ७० टक्के बोअरवेल यशस्वी झाले असून, त्यावर विद्युत मोटारी बसविल्याने गावकºयांना दिलासा मिळाला आहे. अनेक गावात लहान मुले, महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती.