दिलासा ! मराठवाड्यात ५६५ सार्वजनिक विहिरींची कामे पूर्ण; ३ हजार कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 03:13 PM2020-12-30T15:13:55+5:302020-12-30T15:17:08+5:30

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

Comfort! Works of 565 public wells completed in Marathwada; 3 thousand works started | दिलासा ! मराठवाड्यात ५६५ सार्वजनिक विहिरींची कामे पूर्ण; ३ हजार कामे सुरू

दिलासा ! मराठवाड्यात ५६५ सार्वजनिक विहिरींची कामे पूर्ण; ३ हजार कामे सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळावर मात करण्यासाठी साडेपाच हजार विहिरींची कामे

- दीपक ढोले

जालना : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून आठही जिल्ह्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५५१३ सार्वजनिक विहिरींची कामे केली जाणार आहेत. या मोहिमेत आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. विहिरीतून पाणी शेंदतांना अनेकांना जीव गमवावा लागला. तहान भागविण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला. टँकरवरील खर्च टाळण्यासाठी व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलावाच्या ठिकाणी किंवा पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सार्वजनिक विहिरींची कामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

मराठवाड्यात तब्बल ५५१३ विहिरींची कामे करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. या सार्वजनिक विहिरींद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ५५१३ पैकी ४९७१ विहिरींना तांत्रिक मान्यता देण्यात आली. ४५०५ विहिरींना कार्यारंभ आदेश देण्यात आले. ४२६४ विहिरींची स्थळ पाहणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गतवर्षी ३०७४ विहिरींची कामे पूर्ण सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत ५६५ विहिरींची कामे पूर्ण झाल्याचे जालना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी सांगितले. दरम्यान, सध्या मुबलक पाणी असल्याने बहुतांश विहिरींची कामे बंद आहेत.

जालना टॉपवर; अनेकांना मिळाला रोजगार
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जालना जिल्ह्याला ६०७ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६६ विहिरींची कामे सुरू करण्यात आली असून, १८० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मराठवाड्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींची कामे पूर्ण झाली. ३३८ विहिरींना पाणीदेखील लागल्याचे इंगळे यांनी सांगितले.दुष्काळात बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी या विहिरींची कामे मजुरांमार्फत करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार विहिरींची कामेही मजुरांमार्फत केली जात आहेत. या संकल्पनेमुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहेत.

जिल्हानिहाय पूर्ण झालेल्या विहिरींची संख्या
जिल्हा             सुरू विहिरी             पूर्ण विहिरी
औंरगाबाद            २६२                        २४

जालना                ४६६                       १८०
बीड                     ३७८                       १०६

परभणी              ३२७                         ६१
हिंगोली              ५२४                         ९१

नांदेड                 २८५                        ३७
लातूर                 ३४५                       ४५

उस्मानाबाद       ४८७                       २१
 

Web Title: Comfort! Works of 565 public wells completed in Marathwada; 3 thousand works started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.