जलवाहिनी कामावर देखरेखीसाठी समिती नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:40 AM2018-02-28T00:40:24+5:302018-02-28T00:40:30+5:30

जालना शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून अंथरण्यात येत असलेल्या अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. हायड्रोलिक चाचणी न घेता घाईगडबडीत हे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी समिती नेमण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी पालिकेच्या विशेष सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Committee for maintainance of water works | जलवाहिनी कामावर देखरेखीसाठी समिती नेमा

जलवाहिनी कामावर देखरेखीसाठी समिती नेमा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून अंथरण्यात येत असलेल्या अंतर्गत जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. हायड्रोलिक चाचणी न घेता घाईगडबडीत हे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी समिती नेमण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी पालिकेच्या विशेष सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
जालना शहरात भूमिगत गटार योजनेसाठी अमृत योजने अंतर्गत प्राप्त निविदेतील दरपत्रकार मान्यता देणे व प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठविणे या एकमेव विषयार चर्चा करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेकडर सभागृहात दुपारी बारा वाजता सभेला सुरुवात झाली. या वेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.
सुुरुवातीला नगराध्यक्षांनी कामकाजाच्या विषयावर बोलण्याची सूचना केली. एरवी सभागृहात मूलभूत समस्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक होणारे सदस्य सभागृहात गप्प होते. त्यामुळे शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले यांनी ‘आज इतना सन्नाटा क्यूँ है भाई, असा उपरोधिक प्रश्न केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी विषयाचे वाचन करून त्याबाबतची तांत्रिक माहिती सभागृहात दिली. याच वेळी पाचफुले यांनी अंतर्गत जलवाहिनीच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. अंतर्गत जलवाहिनीचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी समिती स्थापन करण्याचे नगराध्यक्षांनी मागील सभेत मान्य केले होते, मात्र कुठलीच समिती स्थापन झाली नाही. शहरात जलवाहिनी अंथरण्याचे काम कंत्राटदाराच्या पद्धतीने सुरू असून, अनेक भागातून नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. असे असतानाही ४० कोटींची देयके अदा केली. यात अनियिमिता आढळल्यास जबाबदार कोण, असा सवाल पाचफुले यांनी उपस्थित केला. तर जलवाहिनी अंथरण्याचे काम बोगस पद्धतीने सुरू असल्याचा थेट आरोप सदस्य रावसाहेब राऊत यांनी केला. जलवाहिनी अंथरलेल्या भागात हाडड्रोलिक चाचणी घेण्याबाबत आपण सभागृहात बोललो होता, समितीबाबत नाही, असे नगराध्यक्षांनी सांगितले. मात्र, समिती स्थापन करण्याच्या मुद्द्यावर अन्य सदस्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर लवकरच बैठक घेवनू याबाबत निर्णय घेतला जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. गटार योजनेचे कामही समितीच्या देखरेखीत व्हावे, अशी सूचना उपनगराध्यक्ष राऊत यांनी सभागृहात मांडली. शेवटी नियमानुसार विषय मंजूर मंजूर म्हणत सभा आटोपती घेण्यात आली.
सभागृहात कायम हिंदीत बोलणारे सदस्य बाला परदेशी यांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी मराठीत बोलण्याचा सल्ला त्यांनी दिला. परदेशी नगराध्यक्षांना उद्देशून म्हणाले, की मी आपणाला माझ्या आईसारखे मानतो. माझी आई मला भूक लागली की लगेच जेवायला देते. मात्र, तुम्ही दीड वर्ष उलटूनही काहीच दिले नाही, असे का? या प्रश्नानंतर नगराध्यक्षा गोरंट्याल यांच्यासह अन्य सदस्यांनाही सभागृहात हसू आवरले नाही. सर्व सदस्यांकडे समान लक्ष देण्याची मागणी परदेशी यांनी नगराध्यक्षांकडे केली.

Web Title: Committee for maintainance of water works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.