जालना पालिकेत विषय समित्या सभापतींचे खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:41 AM2019-01-03T00:41:08+5:302019-01-03T00:41:28+5:30
जालना पालिकेत विविध विषयाच्या समित्यांच्या गठण बुधवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना पालिकेत विविध विषयाच्या समित्यांच्या गठण बुधवारी करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी केशव नेटके हे होते. यावेळी स्वच्छता समिती काँग्रेसने स्वत:कडे घेतली आहे. तर शिवसेनेने ऐनवेळी गटनेतेपदी विष्णू पाचफुले ऐवजी निखील पाखरे यांची निवड घोषित केली.
या निवडीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृ़हात विशेष सभा पार पडली. यात सभापती, उपसभापती तसेच स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या निवड प्रक्रियेदरम्यान सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती श्रावण चुन्नीलाल भुरेवाल, पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती रमेश ब्रिजलाल गौरक्षक, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती पदी जीवन नारायण सले, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती फारुख सादीक तुंडीवाले, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली रुपकुमार चौधरी, महिला व बालकल्याण उपसभापती प्रिती चंद्रशेखर कोताकोडा, स्थायी सदस्य म्हणून नगरसेवक गणेश राऊत, भास्कर दानवे, अशोक पांगारकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर सभागृहाबाहेर जल्लोष करण्यात आला.