महाराष्ट्र नागरिक सभेतर्फे तीन ठिकाणी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:42 AM2018-11-30T00:42:15+5:302018-11-30T00:42:25+5:30
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जालन्यात महाराष्ट्र नागरिक सभेच्यावतीने गुरूवारी जालन्यातील तीन ठिकाणी आंदोलन करून नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जालन्यात महाराष्ट्र नागरिक सभेच्यावतीने गुरूवारी जालन्यातील तीन ठिकाणी आंदोलन करून नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
शेतकरी अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या पुढाकाराने देशातील २२ शेतकरी संघटना मोठे आंदोलन करत आहेत, याआंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी जालन्यातही हे अनोखे आंदोलन केले गेले. यावेळी शिवाजी पुतळा, बसस्थानक, तसेच गांधीचमन भागात तिरंगा मास्क लावून सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी तीनही ठिकाणी युवकांनी मोठा सहभाग नोंदविला होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी या युवकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी संदीप शिंदे, अनिल मिसाळ, प्रभू गाढे, सागर मेघावाले, जय बोंद्रे, राहुल तांबे, शिवा तोगरकर, रेखा काकडे, परमेश्वर आघाव, संतोष बोदलेवाड, निकाळजे, अविनाश देठे, डॉ. रमेश अग्रवाल, डॉ. यशवंत सोनुने, प्रा. राजक्रांती वळसे, प्रा. राम कदम, प्रा. प्रकाश पवार, प्रा. महेर, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. संजय लकडे आदींची उपस्थिती होती.