बंदला जालना जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:29 AM2018-09-29T00:29:08+5:302018-09-29T00:29:25+5:30

केंद्र सरकारच्या एफडीआय व आॅनलाइन खरेदी विक्री या धोरणाविरुद्ध शुक्रवारी सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद होता.

Composite response to strike in Jalna district | बंदला जालना जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

बंदला जालना जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र सरकारने किरकोळ किराणा व्यवसायामध्ये परकीय गुंतवणूकीला परवानगी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील किराणा मालाच्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसणार असून या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे. या निर्णयासोबतच सरकारने औषध विक्रीसाठी ई-पोर्टलची व्यवस्था केली आहे. आॅनलाईन औषध विक्रीमुळे जो मेडिकल व्यवसाय तळागळापर्यंत पोहचला आहे तो संकटात येईल या दोन्ही घटकांसाठी हा निर्णय मागे घेणे आवश्यक आहे.
व्यापारी महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.
जाफराबाद : आॅनलाईन मेडिकल कंपनीच्या निषेधार्थ देशभरातील व्यापाºयांनी शुक्रवारी बंद पुकारला होता. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने या बंदची हाक दिली होती.
या बंदमध्ये सर्व घाऊक बाजारपेठ, किरकोळ बाजारपेठ, व किरकोळ दुकानेही बंद ठेवण्यात येऊन पाठींबा दिला. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाबूराव लहाने, उपाध्यक्ष अजीजखा पठाण, देविदास उबाळे, मोहनराव मुळे, संजय खंडेलवाल, राजू खुणे, छगनराव भोपळे, सईदखा पठाण, अमोल पडघन, विजय कळंबे, सुरेश जंजाळ, प्रल्हाद लोखंडे, सुनील भोसले, उमेश खंडेलवाल, सचिन गौतम, एकनाथ घाटगे, पलस खंडेलवाल, शिवाजी भोंडे, अभय मेठी, मच्छिंद्र थोरात, सर्जेराव मरकड, विष्णू चव्हाण, पुरुषोत्तम कुमावत, माधव चव्हाण, दादाराव चव्हाण, बाळू गाढवे, नितीन राऊत, बंडू लोळगे, नितीन लोखंडे, अविनाश वायाळ, समाधान फदाट आदींची उपस्थिती होती.
भोकरदन येथेही बंद
भोकरदन : भोकरदन शहर व तालुक्यात व्यापारी तसेच औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद ठेवून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
बदनापुरात संमिश्र प्रतिसाद
बदनापूर : बदनापूरसह तालुक्यात शासनाच्या नवीन धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. औषध विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदविला. तहसीलदारांना यावेळी निवेदन देण्यात आले.
मंठ्यातही व्यापाºयांचा बंद
मंठा : मंठा शहरासह तालुक्यात परकीय गुंतवणुकीसह आॅनलाईन औषध विक्री धोरणाचा निषेध म्हणून बंद पाळण्यात आला. बहुतांश औषध विक्रेत्यांनी त्यांची प्रतिष्ठाने शुक्रवारी बंद ठेवल्याचे दिसून आले. यामुळे अनेकांची गैरसोय झाली.
मेडिकल दुकाने शंभर टक्के बंद, रूग्णांची गैरसोय
परतूर: ‘आॅन लाईन खरेदीस परवानगी’ च्या निर्णया विरोधात मेडिकल दुकानदारांनी पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे, यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय झाली. मात्र ईतर बाजार पेठ सुरळीत सुरू होती.
सध्या आॅनलाईन खरेदी करणाºयांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आॅन खरेदीच्या कक्षेत मेडिकललाही परवानगी दिल्याने मेडिकल दुकानदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे या शासनाच्या आॅन लाईन खरेदीस मान्यता देण्याच्या निर्णयाच्या विरोधात मेडिकल दुकानदारांनी शुक्रवारी बंद चे आवाहन केले होते. या बंदला प्रतिसाद देत शहरातील सर्व मेडिकल दुकाने दिवसभर बंद राहीली. ई फार्मसीचा यावेळी निषेध करण्यात आला. ही मेडिकलची दुकाने बंद राहील्याने रूग्णांची मोठी गैरसोय झाली, तसेच याचा भार शासकीय रूग्णायालाही सहन करावा लागला या ठिकाणी रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली होती.
घनसावंगी : व्यापा-यांचा कडकडीत बंद
घनसावंगी येथे केंद्र सरकारच्या एफडीआय व आॅनलाइन खरेदी विक्री या धोरणाविरुद्ध शुक्रवारी सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद होता. सर्व व्यापारी मोठ्या संख्येने बंदमध्ये सहभागी झाले होते. सर्व व्यापारी संस्थाने, हॉटेलसह मेडिकल सर्वच बंद होते. बंद असल्यामुळे मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता. तसेच शाळा, महाविद्यालये दवाखाने चालू होती.
मेडिकलची दुकाने बंद होते. यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले तर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना या बंदचा मोठा फटका बसला. भाजी मार्केट, दूध मार्केटही बंद होते. या महिन्यात अनेक वेळा बंद पुकारल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व छोटे व्यापारी दुकानात काम करणारे मजूर त्रस्त झाले आहेत.
या बंदमध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश कोरडे, विठ्ठल भोसले, सुरेश घोगरे, दिगंबर धुमाळ, अंकुश पवार, सतीश ढेरे, सतीश वाडेकर, निळूभाऊ मते, राजू ढेरे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Composite response to strike in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.