शासकीय रूग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:30 AM2018-10-24T00:30:21+5:302018-10-24T00:30:58+5:30
जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने प्रसुती करण्यासाठी आलेल्या महिलांचे हाल होत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाकडे कर्मचारी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार मागणी करुनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्णांना चांगले उपचार मिळत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ग्रामीण भागात महिलांच्या प्रसुती करण्यासाठी आवश्यक उपचार यंत्रणा नसल्याने जिल्ह्यातील महिला मोठ्या आशेने जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी येतात. मात्र, जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने प्रसुती करण्यासाठी आलेल्या महिलांचे हाल होत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाकडे कर्मचारी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार मागणी करुनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्णांना चांगले उपचार मिळत नाही. परिणामी, नागरिक खाजगी रुग्णालयाला पसंती देतांना दिसत आहे.
जिल्हा रु ग्णालयात एकूण ४१ कर्मचारी असून, यातील प्रसुतीसाठी १२ महिला आहे. मात्र, रुग्णालयात प्रसुती करण्यासाठी येणाºया महिलांची संख्या मोठी असल्याने कर्मचाºयांची कमतरता जाणवत आहे. दररोज प्रसुतीसाठी रुग्णालयात १०० महिला येत असतात.
मात्र, रुग्णालयातील कर्मचारी संख्येअभावी सुविधा देण्यात जिल्हा प्रशासन अपुरे पडत आहे. जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत नसल्याने प्रसुती करण्यासाठी खाजगी रुग्णालयाला पसंती देत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दररोज १८ महिलांची प्रसुती
४जिल्ह्याच्या कानाकोपºयातून जवळपास १०० महिला प्रसुती करण्यासाठी शासकीय रुग्णालयात येतात. त्यातच कर्मचारी १२ असल्यामुळे महिलांना तासनतास बसावे लागते. त्यामुळे एका दिवसात फक्त १८ ते २० महिलांची प्रसुती होते.
कर्मचाºयांची गरज
४शासकीय महिला रुग्णालयात एकूण ४१ कर्मचारी आहे. या ४१ कर्मचाºयांनाच हजारो रुग्णांवर उपचार करावे लागतात. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्मचारी वाढविण्याची गरज आहे.
मुर्हूत लागेना
४२५ कोटी रुपये खर्च करुन जिल्हा शासकीय रुग्णालयांच्या नवीन इमारतीचे काम करण्यात येत आहे. हे काम तीन वर्षांपासून सुरु आहे. हे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नवीन इमारतीचे उद्घाटन करावे, अशी मागणी होत आहे.