संतप्त शेतकऱ्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:38 AM2018-08-05T00:38:14+5:302018-08-05T00:38:26+5:30
आॅनलाईन तसेच आॅफलाईन पद्धतीने भरलेल्या मंजूर पीकविम्याचे पैसे १० आॅगस्टपूर्वी शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली असून, अनुदान जमा न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा शेतक-यांनी निवेदनाद्वारे दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : आॅनलाईन तसेच आॅफलाईन पद्धतीने भरलेल्या मंजूर पीकविम्याचे पैसे १० आॅगस्टपूर्वी शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली असून, अनुदान जमा न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा शेतक-यांनी निवेदनाद्वारे दिला.
गेल्यावर्षीचा खरीप पिकाचा विमा शेतकºयांनी भरला होता. सदरील विमा मंजूर होऊन चार महिने झाले आहेत. या विम्यासाठी शेतकरी बँकेत चकरा मारून थकले आहेत. बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी शेतकºयांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे शेतक-यांतून रोष व्यक्त होत आहे. येत्या १० आॅगस्टपूर्वी पिकविम्याचे पैसे संबंधीत शेतकºयांच्या खात्यात जमा न झाल्यास १३ आॅगस्टपासून उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा संतप्त शेतक-यांनी मुकमोर्चा काढुन उपविभागीय अधिकारी यांना शनिवारी निवेदनाद्वारे दिला.
यावेळी जि. प. सदस्य शिवाजीराव सवने, गोपाळराव बरकुले, चेअरमन मधूकर झरेकर, लक्ष्मीकांत कवडी, मधुकर कापसे, बाळू चव्हाणसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान, यापूर्वीही अनेक प्रकार समोर आले आहेत. याची सविस्तर चौकशी जिल्हाधिकाºयांनी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.