महावितरण व पालिकेत बिलावरून सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:32 AM2018-01-15T00:32:23+5:302018-01-15T00:33:25+5:30

शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

Conflict between MahaVitaran and municipality | महावितरण व पालिकेत बिलावरून सुंदोपसुंदी

महावितरण व पालिकेत बिलावरून सुंदोपसुंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अंबड नगरपालिकेला पाणी देण्याचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. शहागड-अंबड-जालना ही योजना जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून पूर्णत: बंद आहे. असे असतानाही महावितरणने नगरपालिका तब्बल पाच वर्षांनंतर थकित वीजबिल भरण्याबाबत नोटीस पाठवली आहे. योजनेच्या अंबड येथील मीटरवर (क्र.५१००१९००५१०९) १७ कोटी, ४२ लाख ५६ हजार २१८ रुपये आणि शहागड येथील जोडणीवर (क्र. ५१००१९००५०९५) ३३ कोटी, ९५ लाख ३६ हजार रुपये, अशी एकूण ५१ कोटी ३७ लाख ९२ हजार २२० रुपये थकबाकी आहे. दोन्ही ठिकाणच्या जोडण्या कायमस्वरुपी खंडित आहेत. त्यामुळे थकित देयके सात दिवसांत भरावीत अन्यथा थकित रक्कम सध्या जायकवाडी योजनेसाठी सुरू असलेल्या फिल्टरबेड व मस्तगड येथील मीटरवर समायोजित करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद आहे. महावितरणने ही नोटीस देण्याबाबत पालिकेला कुठलीही माहिती दिली नाही. शिवाय थकित बिलाची कुठलीही कॉपी सोबत पाठवलेली नाही.
जालना नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे थकित वीजबिल एकरकमी भरले. सध्या नियमित बिल अदा केले जात आहे. मात्र, महावितरणने भाजप,सेनेच्या राजकीय दबावातून ही नोटीस पाठवली आहे. महावितरणच्या या मनमानीविरुद्ध जनआंदोलन छेडणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. सत्ताधारी नेते जालना पालिका प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. या वेळी नगरसेवक जगदीश भरतिया, शेख महेमूद यांची उपस्थिती होती.
जालन्याची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता अंबडला पाणी देण्याचा कुठलाही करार जालना पालिका करणार नाही. अंबडला केवळ व्यावसायिक दराने पाणी दिले जाईल, असे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. शहागड-जालना अंबड योजेतून अंबडने कुठलाही खर्च न देता अनेक वर्ष फुकट पाणी घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Conflict between MahaVitaran and municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.