शिष्टमंडळाचे महाजनांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:35 AM2019-05-19T00:35:52+5:302019-05-19T00:36:22+5:30
निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू नये म्हणून विरोध वाढू लागला असून, एका शिष्टमंडळाने थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू नये म्हणून विरोध वाढू लागला असून, एका शिष्टमंडळाने थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
निम्न दुधना प्रकल्पात सध्या मृत साठा आहे. यातून परभणीकडे पाणी सोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पाणी सोडू नये म्हणून आंदोलनेही करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची एका शिष्टमंडळाने अंबाजोगाईत भेट घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय मागे घेऊन, आमच्या हक्काचे पाणी सोडू नये अशी मागणी केली. तसे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात सतीश निर्वळ, पंजाबराव बोराडे, संदीप गोरे, नागेश घारे, राजेभाउ खराबे, राजेभाऊ निर्वळ, आबा कदम आदींचा समावेश होता. यावेळी यावर निश्चित विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले.