काँग्रेसच्या शिबिराची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:06 PM2018-02-13T23:06:14+5:302018-02-13T23:06:41+5:30
जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी येथील बगडिया हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यकर्ता शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
जालना : जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी येथील बगडिया हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यकर्ता शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या शिबिरात महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिराच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्याचे पक्षाचे प्रभारी शाम उमाळकर यांनी मंगळवारी दुपारी प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेऊन शिबिरासंदर्भात करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ.कैलास गोरंट्याल, शकुंतला शर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रदेश सचिव विजय कामड, बाबूराव कुलकर्णी, प्रा.सत्संग मुंडे, ज्ञानदेव पायगव्हाणे, राम सावंत, राजेंद्र राख, शेख महेमूद, वैभव उगले, मोहन इंगळे, रोहित बनवसकर, अण्णासाहेब खंदारे, शेख शकील, शेख शमशोद्दीन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.