दरवाढीविरोधात अंबड येथे काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:22 AM2021-07-18T04:22:01+5:302021-07-18T04:22:01+5:30
अंबड : पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दराविरोधात अंबड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी तहसील कार्यालयापर्यंत ...
अंबड : पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या दराविरोधात अंबड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी तहसील कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढून दरवाढीचा निषेध करण्यात आला.
गेल्या दीड वर्षापासून देशातील जनता कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली आहे. अनेकांचा रोजगार गेला असून, हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे; परंतु केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अंबड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर सायकल रॅली काढण्यात आली. तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राणा, केदार कुलकर्णी, संभाजी गुढे, नारायण मुंढे, मुश्ताक शाह, तालुकाध्यक्ष जाकेर भाई, खुर्शीद जिलनी, रिझवान डावरगावकर, अकबर शेख, काशीनाथ शेवाळे, रोहित गुढे, बाबासाहेब घोलप, बाबाराज शिंदे, नरेश शेवाळे, विजय शेवाळे, अजय शेवाळे, सिकंदर पठाण, राहुल कारके, योगेश राऊत, बाळू राजपूत, भाऊसाहेब जाधव, मनीष शेवाळे, विजय शेवाळे, लक्षण पवार, दत्तू पाचुदे आदींची उपस्थिती होती.