काँग्रेस आमदाराकडून राजेश टोपेंचा सत्कार करण्यास नकार, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:20 AM2021-07-27T10:20:09+5:302021-07-27T10:21:24+5:30
Kailas Gorantyal refused to felicitate Rajesh Tope: राजेश टोपेंच्या हस्ते जालन्यातील एका कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं
जालना: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यात एका कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षभेद बाजूला ठेवून राजेश टोपेंचं जाहीर कार्यक्रमात कौतुक केलं. पण, यावेळी त्यांच्या एका कृत्यामुळे कार्यक्रमातील सर्वच उपस्थितांना धक्का बसला.
कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर जालन्यात 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आलंय. राजेश टोपेंच्या हस्ते याचं उदघाटन करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल उपस्थित होते. यावेळी आमदार गोरंटयाल यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना राजेश टोपेंच जाहीररित्या कौतुक केलं. पण, त्यांचा सत्कार करण्यास स्पष्टपणे नकार दिला.
नेमकं काय झालं ?
आमदार कैलास गोरंटयाल यांच भाषण सुरू असतानाच त्यांनी टोपे यांचा सत्कार करण्यास जाहीररीत्या नकार दिला. 'सर्व प्रक्रिया आणि निकष पात्र करून देखील जालन्यात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळत नाही आणि परभणीचा प्रस्ताव नसताना त्यांना परवानगी मिळते याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. यामुळेच कैलास गोरंट्याल यांनी आरोग्यमंत्र्यांचा सत्कार करण्यास नका दिला.