शहागडमध्ये सापडलेल्या नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:26 AM2019-11-11T00:26:44+5:302019-11-11T00:27:20+5:30

नकली नोटा प्रकरणात शहागड पोलिसांनी एकाला अटक केली असून, अटकेतील आरोपीकडे केलेल्या चौकशीत नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे.

Connection of counterfeit notes found in Shahgad to West Bengal | शहागडमध्ये सापडलेल्या नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत

शहागडमध्ये सापडलेल्या नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत

Next
ठळक मुद्देमोठे रॅकेट : इतर आरोपींच्या शोधार्थ पोलिसांचे पथक झाले रवाना

शहागड : नकली नोटा प्रकरणात शहागड पोलिसांनी एकाला अटक केली असून, अटकेतील आरोपीकडे केलेल्या चौकशीत नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. नकली नोटांचे रॅकेट समोर येत असून, इतर आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.
शहागड येथील बसस्थानकासमोरील एका कापड दुकानात दोन हजार रूपयांच्या नकली नोटा घेऊन कापड खरेदीसाठी दोघे आले होते. व्यापाऱ्याला संशय आल्याने त्याने पोलिसांना बोलावून एकाला पकडले. तर दुसरा व्यक्ती दुचाकीवरून पसार झाला होता. या प्रकरणात परमेश्वर मारुती कानगुडे (रा. गेवराई, जि. बीड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. कानगुडे याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर घनसावंगी तालुक्यातील एक, गेवराई तालुक्यातील दोन तर पश्चिम बंगाल मधील दोन अशी पाच जणांची टोळी असल्याचे समोर आले आहे. नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत असल्याने मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना झाली असून, पुढील घडामोडींकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Connection of counterfeit notes found in Shahgad to West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.