खासगीकरणाच्या माध्यमातून आरक्षणाला मुठमाती देण्याचे षड्यंत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:49 AM2018-10-28T00:49:25+5:302018-10-28T00:50:15+5:30
दलित, आदिवासी तसेच ओबीसी या समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य घटनेने आरक्षण दिले. त्यामुळे समाजातील या घटकांची थोडी प्रगती झाली. मात्र, या घटकांना विकासाच्या प्रवाहापासून रोखण्यासाठी नोकऱ्यांचे खासगीकर आणि कंत्राटीकरण करून आरक्षणाला मुठमाती देण्याचे षड्यंत्र या सरकारकडून सुरू आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाधर पानतावणे नगरी, जालना : दलित, आदिवासी तसेच ओबीसी या समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य घटनेने आरक्षण दिले. त्यामुळे समाजातील या घटकांची थोडी प्रगती झाली. मात्र, या घटकांना विकासाच्या प्रवाहापासून रोखण्यासाठी नोकऱ्यांचे खासगीकर आणि कंत्राटीकरण करून आरक्षणाला मुठमाती देण्याचे षड्यंत्र या सरकारकडून सुरू आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी केले.
३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे जालन्यातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते उद््घाटन झाले. यावेळी बोलताना डॉ. थोरात म्हणाले, दलित साहित्याचा पाया महाराष्ट्रात घातला गेला असला तरी, सीमापार करून ते आज सातासमुद्रापार पोहोचले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विपूल साहित्य लिहिले. परंतु त्यावेळी आजच्या एवढा डाटा संकलन नव्हते. त्यामुळे ज्यातून विचारांना प्रेरणा मिळून समाजाचे वास्तव असेल तेच चांगले, असा त्यांचा मानदंड होता. दलित साहित्यात दलित अधिकाºयांचाही सिंहाचा वाटा असल्याचे थोरात म्हणाले. आजही दलित समाजातील जवळपास ६५ टक्के लोक हे आपली उपजिविका मोलमजूरी करूनच भागवत आहेत. मनुस्मृतीमुळे त्यांना संपत्ती निर्मितीचा अधिकार नाकरल्याचे परिणाम आजही ते भोगत असल्याचे वास्तव आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आरक्षण हटविणे कोणालाही शक्य नाही. कल्याणकारी राज्याबाबतच्या सूचना या घटनेनेच सर्वांना दिल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्याला सुरूंग लावण्यासाठी नोकºयाप्रमाणेच शिक्षणाचेही खासगीकरण केले जात असल्याचे थोरात यावेळी म्हणाले.
उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यीक श्रीपाल सबनीस, संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया, नीतीन राऊत यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ. विजय कुमठेकर, निवेदिता पानतावणे यांनी अस्मितादर्शची भूमिका भविष्यातील वाटचालीबद्दल मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी देखील भूमिका विशद केली.
राज्य घटनेची मिरवणूक
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी, सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राज्य घटनेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, माजी मंत्री आणि अ.भा. काँग्रेस समितीच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ. नीतीन राऊत, स्वांगताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अस्मितादर्शच्या संपादिका आणि संवर्धक डॉ. निवेदिता पानतावणे, न. प. उपाध्यक्ष राजेश राऊत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, संमेलन कार्याध्यक्ष डॉ. विजय कुमठेकर, सचिव राम गायकवाड आदींची उपस्थिती होती.
गीता द्यावी पण...
जपानच्या दौºयावर असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानांना राज्य घटनेऐवजी गीता भेट दिली. त्यावर आम्हाला आक्षेप नाही. धर्माचरण करण्याचा अधिकार घटनेने सर्वांना दिला आहे. पण, गीतेत जी वर्णव्यवस्था आहे. तिची अंमलबजावणी करू नका, असा सल्ला थोरात यांनी दिला. वर्णव्यवस्थेतूनच जातीयतेची बीजे रोवली गेली आहेत, असे थोरात म्हणाले.